जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची तीव्र निदर्शने व घोषणाबाजी


लातूर / प्रतिनिधी : जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनी माना टाकल्या असून पीक जिल्हाभर वाळत आहे तरी शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशअध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेने केलेल्या आंदोलनादरम्यान केली.पुढे बोलताना त्यांनी या आठवड्यात जर शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही व संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू असा सज्जड इशारा दिला आहे.या तीव्र निदर्शने आंदोलनात मोठया संख्येने जमलेल्या मनसैनिकांनी बराच काळ जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनाची सांगता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली.ज्यात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी व पूढील काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी हरीण, रानडुक्कर या
वन्यप्राण्यांचा प्रतिबंध करावा,जिल्हयातील पिके वाळत असल्याने पिक विमा कंपनीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी,992 व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या बिजोत्पादन कंपन्यावर कडक कार्यवाही करावी तसेच खत बीयाण्याची लिंकीग, चढयादराने खत बियाण्याची व किटकनाशकाची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांवर कार्यवाही करावी,गोगलगाय व इतर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी,माजी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची शिफारस स्वीकारुन त्यानुसार खरीप व रब्बी पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी,प्रचंड नूकसान होऊनही पिकविमा कंपण्या शेतकऱ्यांना विमा देत नाहीत कंपण्या स्वतःच्या नफेखोरीसाठीच काम करतात असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे असा मनमानी कारभार करणाऱ्या कंपण्यांना ब्लॅकलिस्टेड करावे व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपण्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अश्या शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बाबींचा समावेश आहे.या आंदोलनात मनसे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे,जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे,शिवकुमार नागराळे, संजय राठोड,शेतकरी सेनेचे प्रदेशउपाध्यक्ष भागवत शिंदे,शहराध्यक्ष मनोज अभंगे,जिल्हासचिव रवी सूर्यवंशी,रोजगार स्वयंरोजगार प्रदेश सचिव सचिन सिरसाट,महिला जिल्हाध्यक्ष प्रीती भगत,मनवीसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण,कामगार जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे,वाहतूक जिल्हाध्यक्ष वाहिद शेख,जिल्हाउपाध्यक्ष सचिन बिराजदार,तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, महेश बनसोडे,सोमनाथ कलशेट्टी महेश देशमुख, श्रीनिवास शिंदे, महेश माने,अनिल जाधव, रामदास पाटील, संतोष भोपळे,सुनील तोडचीरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर,अजिंक्य मोरे, ऋषिकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे,पवन राजे,दत्ता म्हात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे,चेतन चौहान,संभाजी सिरसाट, प्रमोद आंबेकर,विशाल कातळे, लक्ष्मण लांडगे महेश नागरगोजे, शिवराज सिरसाट, अंगद खलग्रे,आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp