गंजगोलाईत लोकसभेचे अपक्ष उमेदवार रघुनाथ बनसोडे यांची अनोखी सभा.
सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सर्व महापुरुष व प्रेक्षक म्हणून खुर्चीवर विटा, दगड.
लातूर / प्रतिनिधी : लातूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार रघुनाथ बनसोडे यांनी आज रविवार दि. ५ मे २०२४ रोजी लातूर शहरातील प्रमुख मार्केट असलेल्या मस्जिद रोड, गंजगोलाईत आज दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान एक अनोखी अशी अगळी वेगळीच जाहीर सभा झाली. या जाहीर सभेस अपक्ष उमेदवार रघुनाथ बनसोडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजर झालेल्या व्यासपीठावरील खुर्चीतील महापुरुषांना व प्रेक्षक म्हणून खुर्चीवर ठेवलेल्या विटा, दगडे या मूक नागरिकांना या निवडणूक विषयी मार्गदर्शन केले व प्रचाराचा आज ५:३० मिनिटाला शेवट केला असल्याने या अनोख्या सभेला पाहण्यासाठी नागरिकांनी गंजगोलाईत मोठी गर्दी केली होती.
यावेळी लातूर जिल्ह्यातील 25 नंबर ईव्हीएम मशीन वरचे अपक्ष उमेदवार ज्यांचे चिन्ह प्रेशर कुकर असून यांची आज सभा मज्जित रोड गंजगोलाई या ठिकाणी संपन्न झाली या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून सर्व महापुरुष व या सभेत नागरिक म्हणून विटा, दगड ठेवण्यात आले होते. आज रविवार असल्याने लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या सभा झाल्या परंतु मस्जिद रोडवरील गंजगोलाई या ठिकाणी अपक्ष उमेदवार रघुनाथ बनसोडे यांचे चिन्ह प्रेशर कुकर घेऊन त्यांची लातूरातील आगळीवेगळीच सभा यात प्रमुख पाहुणे म्हणून सर्व महापुरुष व प्रेक्षक म्हणून दगड, विटाची सभा जी की कोठेतरी रेकॉर्डवर नोंद होण्यासारखी सभा पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी येथे मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक आवाज ऐकून या ठिकाणी येत नागरिक मोठ्या संख्येने उभे राहून भाषण ऐकत व पहात होते त्याच बरोबर महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी यांचीही संख्या खूप मोठी होती.


