लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या पदाधिकार-यांचा व कार्यकर्त्यांचा बुधवारी सत्कार
लिंगायत महासंघाच्या उदगीर च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बुधवार दि 6/10/2021 रोजी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते दुपारी २.००वाजता सत्कार करण्यात येणार आहे.
परवा उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधुवर मेळावा उत्साहात पार पडला. केंद्रीय मंत्री ना भगवंतराव खुब्बा , उदगीरचे आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे खा सुधाकर श्रंगारे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्यासह शहरातील सर्व माजी आमदारसह, विविध पक्षाचे राजकारणी मंडळी, लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाअध्यक्ष विविध गावचे सरपंच चेअरमन आदींची उपस्थिती लाभली होती.हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात व कर्नाटक, तेलंगणा राज्यामधील प्रमुख मंडळीत झाली. लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांच्या सडेतोड भाषणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या तळमळीची दोन्ही मंत्री महोदयांनी खूप प्रशंसा केली. मंत्री महोदयांनी कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी फोन करून सरांचे अभिनंदन केले. यापुढे आपण मिळून कार्य करण्याचे आश्वासन दिले.शेकडो समाजबांधवांनी व हितचिंतक, मित्रांनी, अधिकारी वर्गातूनही प्रा सुदर्शनराव बिरादार सरांचे जोरदार अभिनंदन केले गेले. उदगीर शहरातील व्यावसायिक, व्यापारी बांधवांनी बिरादार सरांचे फोन करून अभिनंदन केले. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगितले. तसेच लिंगायत समाजातील अनेक समाजबांधवांनी सरांना फोनवर शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यामुळे उदगीर शहरातील समाजबांधवांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा सुदर्शनराव बिरादार सरांच्या रुपाने उदगीरच्या लिंगायत समाजाला एक भक्कम आधार भेटला असल्याची चर्चा उदगीर मध्ये जोरदार सुरू असुन हा माणूस गोरगरिबांना साथ देणारा निस्वार्थ समाजसेवक असल्याचीही चर्चा समाजात सुरु आहे. हे सर्व प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सरांच्या नेतृत्वाने केले आहे. व त्यांना उदगीरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साथ दिली त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकासंघटक अमरनाथ मुळे, तालुकाध्यक्ष प्रा राजेश्वर पाटील, शहराध्यक्ष प्रकाश तोंडारे, वधुवर मेळावा प्रमुख तानाजी सोनटक्के ,प्रसिद्धी प्रमुख सुभाष शेरे, शहर सरचिटणीस प्रा पंडित देवशेट्टे प्रभुराजज कप्पीकेरे चंद्रकांत सिरसे, परमेश्वर पटवारी, सौ कांता बुळ्ळा, प्रा प्रकाश करेप्पा बापुराव शेटकार सौ चंद्रकला शेटकार प्रा सिद्राम शेटकार, निलेश हिप्पळगे व ईतर सर्व पदाधिक- यांनी केले आहे.