लुंबिनी बुद्ध विहार येथे बुद्ध जयंती निमित्त ध्वजारोहण व विविध कार्यक्रम संपन्न

उदगीर / प्रतिनिधी : शहरातील नई आबादी येथील बुध्द विहारात बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने शांतीचे प्रतिक आसलेले तथागत गौतम बुद्ध यांची २५६६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध जयंतीची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते तथा अग्रो इंडिया व्रतपत्राचे संपादक बालाजी टाळीकोटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
या वेळी बुद्ध मुर्तीला पुष्पं अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती पुढे पुष्पं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व पंचशील, त्रिशरण,आष्टांग गाथा पठन करण्यात आले. आणी उपस्थित समुदायाला सामाजिक कार्यकर्ते बालाजी टाळीकोटे यांनी तथागत बुद्धांचा पंचशील, त्रिशरण संदेश आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा यांचे तंतोतंत पालन करणे हे बौद्ध उपासकांचे अद्य कर्तव्य आहे आणी ते सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करून जिवन जगने महत्त्वाचे आसल्याचे सांगितले.
या वेळी व्यंकटराव सोनवने,ताणाजी मादळे,अनुसयाताई सोनवने, कमलबाई शेल्हाळकर,भानूदास कोदळीकर आदींसह असंख्य लहान मोठे उपासक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वसंतराव शेल्हाळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp