लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

( वृत प्रतिनिधी : विकास कांबळे)

आज दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित असणाऱ्या क्रांतिवीर लहुजी साळवे कंपोझिट सेंटर ब्रीज एज्युकेशन अँड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर स्कूल, तीर्थ बु. कै.धर्मवीर आनंद दिघे आश्रम शाळा
तीर्थ बु.,राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय वस्तीगृह तीर्थ बु., अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय कन्या वस्तीगृह , तीर्थ बु. तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आज लोकशाहीर ,साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे यांची जयंती मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विविध कार्यक्रमाने उत्साहात पार पडली.
या वेळी कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक तथा सचिव श्री.दिनेश क्षीरसागर सर व मा.देवकर सर यांची उपस्थिती लाभली. संस्थापक श्री क्षीरसागर सर, प्रतिनिधी विवेक क्षीरसागर सर, क्षीरसागर मॅडम, मुख्याध्यापिका सौ.अनिता पांढरे मॅडम , संस्था अधीक्षक श्री.तुळशीराम देडे सर, प्रा.विकास कांबळे सर, प्रा.सोनवणे सर , प्रा.प्रधान पवार , प्रा. आप्पा धर्मसाठे यांनी आण्णा भाऊंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे विचार मांडले. समाजातील विविध घटकातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या प्रत्येक मुलांनी प्रथम शिक्षणाची वाट धरली पाहिजे.हीच साहित्य रत्नास खरी मानवंदना होय.असे सामाजिक प्रबोधन पर गौरवोद्गार प्रा. श्री.दिनेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले .
लहुजी शक्ती सेना मुरूम चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. तूळशीराम देडे यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश या वेळी विद्यार्थ्यांना दिला. संस्था प्रतिनिधी श्री.विवेक क्षीरसागर व श्री प्रमोद कांबळे यांनी जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्या ना आंबा वृक्ष कलम भेट देऊन पर्यावरणाशी एकरूप राहण्याचा संदेश दिला. अशा प्रकारे विविध उपक्रमांनी कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था कर्मचारी श्री.श्रीकृष्ण पांढरे, श्री. पांडुरंग धनके यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp