लोहारा येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पी एम एफ एम इ अंतर्गत उपविभागीय कार्यशाळा संपन्न झाली
लातूर / प्रतिनिधी : दिनांक 31/03/ 2023 रोजी लोहारा या गावी 150 ते 170 शेतकरी व सुशिक्षित बेकार महिला पुरुष उपस्थित होते. या सर्वांना उद्देशून प्रथमता श्री विकास बालकुंदे जिल्हा समन्वयक पीएमएफएमइ यांनी आपल्या ओजस्वीवानीतून संबंधित व्यवसाय विषयी सखोल ज्ञान दिले, ज्यामुळे ज्यामध्ये पिठाची गिरणी तेल घाना, मिरची कांडप यंत्र, हळद निर्मिती उद्योग, कच्चा मालापासून पक्का माल तयार करून त्याची बाजारपेठ, विक्री कौशल्य, बँक सलग्न कागदपत्र, लाभार्थी सिबिल रिपोर्ट या प्राथमिक बाबीची माहिती सर्वांना
समजेल अशा शब्दात दिली, त्यावेळी उपस्थिताच्या प्रश्न उत्तराची ही समस्या सोडवली. यानंतर डीआरपी दिनेश शिंदे संबंधितांना आपला प्रस्ताव बँकेत कसा सादर करायचा व त्याविषयी आणि अडचणीवर कशी मात करायची व आपल्या कुटीरउद्योग उभा करून त्या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारताची पकड मजबूत करायची याविषयी ज्ञान दिले. या कार्यक्रमात सताळा येथील लाभार्थी महादेव किरकोळ यांना तेलघाना उद्योगासाठी करडखेल एसबीआय शाखेच्या मॅनेजर अंजली पाटील यांच्या शुभहस्ते पाच लाख रुपयाचा डीडी देण्यात आला. अंजली पाटील यांनी या उद्योगा विषयी प्रस्ताव सादर करताना लाभार्थीने कोणती काळजी घ्यावी याविषयी
माहिती दिली. यानंतर श्री नितीन बा. दुरुगकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी महिलांना यापुढे प्रत्येक गटामध्ये अथवा शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये शेतकरी म्हणून सभासदत्व घेऊन लाभ घेता येतो या जीआरची सविस्तर माहिती दिली तसेच यापुढे कुठलीही अडचण लाभार्थीना वा महिलांना आल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधा असे आवाहन केले व या पीएफएमइ उद्योग उभा करताना प्राथमिक ज्ञान कसे प्राप्त करावे त्याची कार्यशाळा जिल्हा पातळीवर तीन दिवस विनाश शुल्क असते त्याचा लाभ घेऊन लाभार्थीने आपल्या खारीचा वाटा आत्मनिर्भर मध्ये उभा करावा व देश सुजलाम सुफलाम घडवावा, आपली आर्थिक उन्नती साधताना अनेक अडचणी येतात मात्र त्याला खचून जाऊ नये त्यासाठी संघर्ष करून समस्याचे निराकरण करावे असे आपल्या पाठांतर कवितेतून सर्वांना वाचून
समर्थपणे तोंड द्यावे असे ठासून सांगितले. त्यामुळे उपस्थितामध्ये एक वेगळा आनंद व विश्वास निर्माण झाला . यानंतर श्री राजेंद्र इंगळे, विभागीय संचालक अफार्म, लातूर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्याचे कार्य काय आहे व संकल्पना कशासाठी आहे, मुख्य वैशिष्ट्ये याचा विचार करून लोहारा येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी म. कंपनीची स्थापना झाला आहे याचा लाभ या बाजूच्या गावांनी घ्यावा व आपले सभासत्व पूर्ण करावे व वेळोवेळी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्ञान संपादन करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश टी. जाधव, उपविभागी कृषी अधिकारी, उदगीर यांनी संबंधितांना उद्देशून सांगितले की यापुढे सेव मदर सेव लाईफ म्हणजे तेल घाण्याचे तेल का खावे रिफाईंड तेल का नको, जवस, करडी तेल निर्मिती पीक याविषयी सखोल ज्ञान देऊन त्यापुढे शेतकऱ्यांनी कडधान्य व तेल निर्मिती पीक या विषयी सखोल ज्ञानदेऊन या पुढे शेतकऱ्यांनी कडधान्य, तेल निर्मिती धान्याचे उत्पादन भरीव कसे घ्यावे असे नवीन
वाण मार्केटमध्ये आले आहे त्याचा प्रत्यक्ष रूपात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रयोग करून उतारा घ्यावा. पी एम एफ इ या योजनेचा शेती सलग्न व्यवसाय उभारणीत भरीव पद्धतीने लाभ घेऊन आत्मनिर्भर भारत घडवावा असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश शिंदे यांनी केले व कार्यक्रमाला श्री. हंसराज मोमले, अध्यक्ष बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादा लोहारा व सर्व संचालक मंडळ, यशवंत गायकवाड अफार्म, लातूर, राहुल जाधव, बीटीएम देवणी, अभिलाष शिरसागर बीटीएम जळकोट, वासुदेव कुलकर्णी बीटीएम, अहमदपूर पत्रकार गंगाधर बिरादार, संदीपान अंधारे आत्मा उदगीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश कारभारी शेतकरी मित्र लोहारा यांनी केले.

