वडमुरंबी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जयप्रकाश झेरीकुंठे तर व्हाईस चेअरमनपदी शिवराज बिरादार यांची निवड.
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
-देवणी तालुक्यातील वडमुरंबी व बोळेगाव या संयुक्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवड दिनांक 04 एप्रिल 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय वडमुरंबी येथे निवडणूक निर्णयअधिकारी अहिनिलवार एस.एल.व गटसचिव सेक्रेटरी रसूल शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
वडमुरंबी व बोळेगाव या संयुक्त विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी जयप्रकाश काशिनाथ झैरीकुंठे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी शिवराज रामचंद्र बिरादार वडमुरंबीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नूतन पदाधिकारी व संचालकांचा शाल, श्रीफळ,
फेटा, पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. वडमुरंबी विविध विकास सोसायटीच्या या अटीतटीच्या निवडणूक लढाईमध्ये जयप्रकाश झेरीकुंठे यांच्या विविध कार्यकारी सेवा शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. या विविध विकास सोसायटी कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
चेअरमन – जयप्रकाश काशिनाथ झेरीकुंठे, व्हॉईस चेअरमन – शिवराज रामचंद्र बिरादार तर सदस्य पदी- चनबस नागनाथ स्वामी, नरेंद्र धनराज बिरादार, भंडे रावसाहेब मालबा,बालाजी त्र्यंबक मुस्तापुरे, बिरादार बाबुराव रामचंद्र, विश्वकर्मा कैलास नागमूर्ति, झेरीकुंठे कविता जयप्रकाश, सूर्यकलाबाई गुणवंतराव सावरगावे, गायकवाड पदमीनबाई ओमकार, शिवलिंग विरायप्पा स्वामी, जडगे महादेव पंढरीनाथ, यांची सदस्य पदी निवड
झाल्याबद्दल बोळेगावचे मलिकार्जुन बाबुराव पोलीस पाटील, उद्योगपती तेलगावे प्रकाश बाबुराव,माजी सरपंच बालाजी विश्वनाथ झेरीकुंठे, वडमुरंबीचे कल्याणराव माधवराव पोलीस पाटील, देवणी पंचायत समितीचे माजी सदस्य शिवराज आप्पा बिरादार, सरपंच रामभाऊ मोरे, उपसरपंच संतोष बिरादार, धनराज मनोहरराव बिरादार, रामकृष्ण पांचाळ, सोपानराव संभाजी जाधव, दिलीप मल्लिकार्जुन पाटील,नवनाथ नागनाथ स्वामी, काशिनाथ म्हेत्रे,चांडेश्वरे योगीराज काशिनाथ, रामेश्वर स्वामी,वैजनाथअप्पा स्वामी, माधवराव मोरे, प्रल्हाद गायकवाड, संजीव सुभाष आंबेवाले, इत्यादींनी या निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.