वडमुरंबी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देवणी: तालुक्यातील वडमुरंबी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक भरत निलेवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गंगुबाई मोरे, कुसुमताई बिरादार, रेखा आवळे ,शिल्पा मोरे, सुलोचना कळसे,संगीता कांबळे,अन्नपूर्णा कांबळे,सखुबाई मोरे, रोहिदास मोरे,शिवाजी सूर्यवंशी, परमेश्वर मामडे, विनायक मोरे माधव मोरे,अशोकराव मोरे आदी उपस्थित होते.यावेळी अस्मिता शिवानंद पाटील ही ८०% घेऊन तालुक्यातून प्रथम आली व जिल्ह्यातून नववी आलेली, समीक्षा शिवानंद आवाळे ही ७९ % घेऊन तालुक्यातून द्वितीय आली असून जिल्ह्यातून ती सोळावी आलेली आणि शिष्यवृत्तीधारक झालेले विद्यार्थी निखद वाहेद शेख (७७%) , भक्ती गणपत मोरे (७६%), सोनाली गणपत कांबळे (७४%) अतिक महंमद मुल्ला (७४%) या सर्व विद्यार्थ्यांचे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी,प्रवीण डोईजोडे , प्रा रेवण मळभगे, शेषराव राठोड , रामदास ढगे , विजयकुमार पाटील, संतोष पाटील, प्रवीण रणदिवे आदींसह गावातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.