वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या वतीने सोनेगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न.
उस्मानाबाद / प्रतिनिधी (विकास कांबळे) : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे संस्थापक दिवंगत समाजसेवक कै. श्री.प्रवीण पिसाळ सर यांना स्मरून आज सोनेगाव ता. जि. धाराशिव येथे सह्याद्री ब्लड बँक ,( धाराशिव) उस्मानाबाद यांच्या रक्तपेढी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोनेगाव येथील सरपंच सौ.सुवर्णमाला ताई पाटील , उपसरपंच श्री.प्रमोद पवार , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जाधव यांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी
सोनेगाव व गुंजेवाडी येथील तरुणांनी रक्तदान करून प्रवीण पिसाळ यांनी सामाजिक आदरांजली अर्पण केली. रक्तदान शिबीर मध्ये मनोज मोरे, अमोल जाधव , प्रमोद पवार , आदित्य लाकाळ , विकास कांबळे, अजिंक्य पाटील , सागर वायकर , सतीश सांगळे , सुधाकर सांगळे, संदीप वायकर, रोहन गोफने, बापू सुरवसे, दिनेश मोरे, जोती राम मोरे, स्वामी गेंड , दादा आरगडे, पृथ्वीराज रणखांब, सुरेश सूरवसे, बळीराम मोरे, तुषार मुंढे, विनोद माने , दादा गोफने, अक्षय गोफने , किरण माने, बापू विधाते आदी युवकांनी रक्तदान साठी पुढाकार घेतला.शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर तोडकरी, महेश तोडकरी, हर्षदा धोंगडे या लॅब टेक्निशियन नी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी म्हणून रस्त्यावरील वाहनांच्या अपघातापासून संरक्षण व्हावे हा अतिशय चांगला सामाजिक उद्देश लक्षात घेऊन रक्त दात्याना हेल्मेट चे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना रक्तदान सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ,महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे व तरुणांनी केलेल्या या रक्त दानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

