खास बातमी.. विशेष बातमी…
वलांडी येथे ऊसाची ट्राॅली पलटून जीपचा झाला चुराडा.
सुदैवाने जीवितहानी नाही. खराब रस्त्याचा परीणाम.
देवणी / विशेष प्रतिनिधी (दत्ता पाटील तळेगावकर) : तालुक्यातील वलांडी येथे उदगीर निलंगा रोडवर मुख्य चौकात ऊस वाहतूक करणारा डबल ट्रॅली ट्रॅक्टरची मागची दोन नंबरची ट्रॅलीचे एक्सल तुटून टायर निघाल्याने बसस्थानकावर थांबलेल्या क्रुझर जीपवर पल्टी झाले. सदर घटना दुपारी 5:30 च्या सुमारास घडली.
सध्या देवणी तालुक्यातील मौजे तळेगाव भो येथील जागृती शुगर कारखाना गळीत हंगाम चालू असून निलंगा उदगीर वलांडी मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दि 1 मार्च रोजी दुपारी 5:30च्या दरम्यान ऊसवाहतुक करणारा डबल ट्रॅली ट्रॅक्टर क्र.MH 24 AW 6322 याची मागील दोन नंबरची ट्रॅली वलांडी येथील भर चौकात रोडच्या कडेला थांबलेल्या क्रुझर क्र.MH 24 C 4652 या गाडीवर ट्रॅलीचे अक्सल तुटल्याने पलटी झाली. सुदैवाने गाडीत व गाडीच्या जवळ कोणीही नसल्याने कसलीही जीवीतहनी झाली नाही. पण क्रुझर गाडीचा मात्र चुराडा झाला आहे. परिणामी आणि गत तीन वर्षापासून याच रोडचे काम कासव गतीने होत असल्याने संपूर्ण रस्ता उकरून ठेवला आहे. यामुळे रोडवर खडी व खड्डे पडल्याने आवजड वाहतुक करणा-या वाहानासह सर्वच छोट्या मोठ्या वहानधारकाना याचा नाहक त्रास होत आहे. तर उडणा-या धुळीमुळे नागरीकाचे, प्रवाशाचे आरोग्य धोक्यात आहे. याकडे कोणताही मंत्री, आमदार खाजदार, स्थानीक पुढारी अधिकारी यांचे लक्षच नसल्याने रोडच्या कामाला गती येत नाही. देव जाणो असेच किती दीवस चालणार? आसा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे..