वलांडी येथील सरपंच सौ. राणीताई भंडारे यांना सन 2023 चा मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान…

देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील वलांडी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सरपंच सौ. राणीताई भंडारे यांना सन २०२३ चा मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय राजीव गांधी उत्कृष्ट सरपंच पुरस्कार प्रदान
भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी २१ मे २०२३ रोजी नागपूर येथे सरपंच सौ. राणी ताई भंडारे यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ,सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट आणि व्यापक करणे गरजेचे असल्याचे सत्कारमूर्ती मा सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी सत्कार प्रसंगी आपली भावना व्यक्त केली याप्रसंगी हिंगणा तालुक्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी मा. प्रशांत आनंदराव दुरुगकर आणि लातूर जिल्ह्यातील वलांडी या गावच्या सरपंच राणीताई राम भंडारे यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न गाव कारभारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात.आला याप्रसंगी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शेतकरी नेतृत्व मा. प्रकाश साबळे तसेच शेतकरी निवड समितीच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमाताई सवाई, मा. प्रफुल गुडधे, मा.जीया पटेल, मा. रवींद्र दरेकर, मा.नरेंद्र जिचकार, मा.प्रा दिलीपराव काळे, मा. अविनाश पांडे,मा. भैयासाहेब निचळ, मा. नामदेव वैद्य, मा. मिलिंद फाळके, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देऊन या देशातील शेतकरी आणि शेतीला प्रगत करण्याचे महान कार्य स्व. राजीव गांधी यांनी केले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावा,
*यासाठीच शेतकरी सन्मानाचा उपक्रम हाती घेतल्याचे प्रतिपादन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी केले.
आणखी एका पुरस्कारावर नाव कोरून आपल्या वलांडी चे नाव उज्वल केल्याबद्दल सरपंच ताईंचे देवणी तालुक्यातील सर्व स्तरावर पत्रकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे,

शेतकऱ्यांच्या विदर्भ मराठवाड्यातील होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व व्यापक करणे गरजेचे असल्याचे सत्कारमूर्ती मा.सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी सत्काराप्रसंगी आपली भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp