नांदेड
: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापी
ठ, परभणी द्वारे प्रसारीत
आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादीत करण्यात आलेल्या प्रमुख रब्बी पीकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आले आहे.
त्यामुळे विद्यापीठाद्वारे निर्मीत शुद्ध बियाणे आणण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील शेतकर्यांाना परभणी येथे जाणे जाण्याची गैरसोय टळणार आहे. कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे उपलब्ध करण्यात
आलेले
विवीध पीकांचे बियाणे, त्यांचे वाण, पिशवीचे वजन आणि त्याची किंमत
खालीलप्रमाणे आहे.
वरील पैकी
हरभरा पीकाचा बीडीएनजी ७९७ (आकाश) हा देशी वाण असून कोरडवाहू लागवडीसाठी योग्य वाण आहे. तर
बीडीएनजीके ७९८ हा काबुली प्रकारातील वाण असून बागायती लागवडीसाठी सुयोग्य आहे.
हरभरा पीकाच्या पिशव्यांचे वजन १० किलोग्राम असून
बीडीएनजी ७९७ (आकाश) या वाणाच्या पिशवीची किंमत रू. ८००/- तर
बीडीएनजीके ७९८ (काबुली) वाणाच्या पिशवीची किंमत रू. १०००/- आहे.रब्बी ज्वारीचा
एसपीव्ही १४११ (परभणी मोती) हा मोत्यासारखे चमकदार – टपोरे दाणे व भाकरीची उत्तम चव असणारा वाण आहे.
सीएसव्ही १८ (परभणी ज्योती) हा उंच वाढणारा
बागायती पेरणीसाठी उत्तम वाण आहे तर
एसपीव्ही २४०७ (सुपर मोती) हा धान्य व कडबा दोन्हीकरीता लागवडीस योग्य वाण आहे.
रबी ज्वारीच्या सर्व वाणाच्या पिशव्यांचे वजन ४ किलोग्राम असून एका पिशवीची किंमत रू. ३२०/- राहील.
त्याचप्रमाणे जवस पीकाचा कमी कालावधीमध्ये काढणीस येणारा नव्याने प्रसारीत करण्यात आलेला एलएसएल-९३ या वाणाच्या ५ किलोग्राम वजनाच्या पिशवीची किंमत रू. ५००/- आहे.
. उपरोक्त बियाण्याची
दि. १ ऑक्टोबर २०२१ पासून कापूस संशोधन केंद्र, देगलूर रोड, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत विक्री करण्यात येणार आहे.
आगामी काळामध्ये करडई पीकाचे बियाणेदेखील या ठिकाणी उपलब्ध होईल. तरी इच्छुक शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा.