वाईस ऑफ मिडियाच्या वतीने पत्रकाराच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

देवणी : येथील वाईस ऑफ मीडिया शाखा देवणीच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवार दि.२९ ऑगस्ट रोजी देवणी तहसील प्रशासनास देण्यात आले.या निवेदनावर ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती तसेच
टीव्ही, रेडियोआणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.
अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आदी प्रमुख मागण्यासह इतर मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल, वाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रेवण मळभगे ,दत्ता पाटील, बालाजी कवठाळे,शकील मणियार, प्रमोद लासोणे, प्रताप कोयले, जाकीर बागवान, कृष्णा पिंजरे,राहुल बालूरे, लक्ष्मण रणदिवे, जयेश ढगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp