वाद नको संवाद हवा

आज स्वतः ला आंबेडकरवादी समजून स्वतः ला संविधानाचे रक्षण कर्ते मानणाऱ्या आंबेडकरी नेत्यांनी आप आपसात वाद न वाढवता संवाद वाढविला तर त्याचा फायदा होईल. भारतीय संविधान जवळ जवळ संपले आहे. आज खरं बोलायची खरं लिहायची हिम्मत होत नाही एवढी दहशत निर्माण झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन, स्वतः ला आंबेडकरवादी समजणाऱ्या अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आहेत. काही काही नेत्यांची परिस्थिती खुप वाईट असली तरी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे वर्चस्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. गाव तेथे आंबेडकरी नेता निर्माण झाला आहे. तालुका स्तर, थोडीफार जिल्ह्याची माहिती असणाऱ्या लोकांनी स्वयंघोषित राष्ट्रीय पक्ष निर्माण केले आहेत. आंबेडकरी चळवळीचे लेबल लाऊन प्रत्येक नेता हा स्वतः ला खुर्ची कशी मिळेल यातच मग्न झालेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली शेकडो पक्ष संघटना महाराष्ट्रात कार्यरत असताना प्रत्येक जण मीच योग्य कसा हे सांगण्यात तल्लीन झालेला आहे. आंबेडकरी विचार धारेच्या लोकांचे विभाजण करून आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांना खत पाणी घालण्याचे प्रभावी पणे काम हे बेकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणारे लोक करत आहेत. प्रत्येक जण म्हणतो सगळ्यांनी एक यावे पण कोणी एक येताना दिसत नाही कारण प्रश्न निर्माण होतो तो एकीकरण करायचे तर नेतृत्व कोणाचे असायला पाहिजे. सक्षम व प्रभावशाली नेतृत्वाचे दावेदार सर्वच जण आहेत म्हणून तर आंबेडकरी चळवळीचे एवढे तूकडे करण्यास प्रत्येक जण यशस्वी झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा व संविधानाला मानणारा एकमेव मीच आहे अशा अविर्भावात राहुन शक्तीचे विभाजन करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्ते यांनी आज एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच नव्हे तर भारतीय संविधान धोक्यात असताना आपण आपला अंहकार बाजूला सारूण संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र येऊन एक मोठी ताकद उभी केली तर समस्त बहुजन समाजा समोर एक मोठा आदर्श निर्माण होऊन बहुजन समाजातील वैचारिक लोकांचा बिनाशर्त पाठिंबा मिळेल. एकीचे परिणाम माहिती असताना सुद्धा वैयक्तिक स्वार्थ, मतभेद, खुर्चीच्या अपेक्षे साठी स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेऊन जर आपण आपला एक विधान सभा सदस्य अर्थात एक आमदार निवडणूक आणु शकत नाही तर आपण राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडून आंबेडकरी चळवळीचा एक सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केले तर खऱ्या अर्थाने आपण समजदार आहोत याची प्रचिती समाजाला येईल व समाजाची अर्थात चळवळीची शक्ती एकत्र येईल. आणि बेकीचे राजकारण करून ज्या खुर्चीच्या मागे आपण धावत आहात त्या पेक्षा मोठी खुर्ची आपल्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही. कारण सध्या प्रस्थापित असलेले आंबेडकरी नेत्यांनी जर कार्यकर्त्यां ची भुमिका घेतली तर नेतृत्व सर्व सामान्य व्यक्ती मुळीच करणार नाही. ते नेतृत्व तुम्हाला करायला मिळणार आहे पण थोडे लवचिक होऊन लहान पणाने वागण्याचा प्रयत्न केला तर मोठे काम सहज होऊ शकते. बाबासाहेब यांनी बहुजन समाजाला संघटीत करून लोकशाही रूजवण्याचा सल्ला दिला. परंतु आंबेडकरी चळवळीने बाबासाहेब आंबेडकर यांना एवढे डोक्यावर घेतले की बहुजन समाजातील लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला व कार्याला स्पर्शच करू दिला नाही. आणि स्वतः ला आंबेडकरी समजणाऱ्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन विचार मंचावरून फक्त धार्मिक केले आहे. हिंदू धर्म सोडला बौद्ध धर्म स्विकारला, आमच्या बापानी आमच्याच साठी संविधान लिहले असे वक्तव्य करून बहुजन समाजा पासुन विचार धारा दुरच ठेवली. भारतीय संविधानाला हात लावला तर हात कलम करू हे वक्तव्य बहुजन समाजातील लोकांनी कदाचित ऐकले असेल म्हणून देशभक्ती अंगात आणणाऱ्या लोकांनी संविधानाचे पुस्तक देखील पाहिले नाही वाचले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना एका चौकटीत बंद करण्याचे मोठे काम स्वतः ला आंबेडकरी समजणाऱ्या व कंसात असलेल्या राष्ट्रीय नेत्यांनी केले आहे. एक वेळेस आपण असेही मान्य करू संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धांसाठीच लिहले मग तेच संविधान धोक्यात असताना सर्वांनी एका छताखाली येऊन आपली ताकद निर्माण करू नये का? बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चळवळ चालविताना एकमेकांवर वैयक्तिक जास्त दोषारोपन करून आपला शत्रु फक्त आंबेडकरी चळवळीचा दुसरा तूकडाच आहे हाच समज सर्वांचा झाला आहे म्हणून आंबेडकरी चळवळ चालविणारे नेते कार्यकर्ते आप आपसातच भांडत आहेत. या मुळे आपला खरा शत्रु कोण याचा विसरच पडलेला आहे आणि याच परिणाम शत्रुची ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. एक दिवस शत्रु वरचढ होईल व आपल्याला आंबेडकरी म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार राहणार नाही. संविधान असताना सन्मानीय राष्ट्रपती यांना मंदिर प्रवेश नाकारला जातो तर सर्व सामान्य लोकांचे काय होईल हे कल्पना शक्तीच्या बाहेरचे आहे. आप आपसातील वैर मत भेद विसरून जर प्रत्येक जण एकीकरणाची भुमीका घेऊन कार्यकर्ता बनला तर कमी पैसा, वेळ, श्रम खर्च करताना देखील आपण आपले प्रतिनिधी नियुक्त करून आपल्या हक्क अधिकाराचे रक्षण करू शकतो. हे एकिकरण करताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे की खऱ्या अर्थाने संविधानाचे समर्थक कोण व विरोधक कोण हे आपल्याला कळणे महत्त्वाचे आहे. संविधानाच्या नावाखाली आपण आपल्या मानसाला नाकारून शत्रुला सोबत घेऊन बसलो तर आपण सुद्धा संविधान विरोधक म्हणून गणलो जाऊ. व चळवळीची ताकद कमकुवत करून शत्रुचीच ताकद वाढवू. ही वेळ संघर्षाची आहे म्हणून कोणत्याही आमीषाला बळी न पडता व वर्षानुवर्षाचे वैर विसरून एका विशिष्ट मुद्यावर एकत्र येणे आवश्यक आहे. संविधान वाचवायचे तर हे करणे आवश्यक आहे एकिकरणाचा प्रयोग आपण महाराष्ट्रात यशस्वी करू शकलो तर हाच प्रयोग संपूर्ण भारतभर यशस्वी करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. नेते वेगवेगळे का गेले हे कार्यकर्त्याना माहिती नाही. सर्व सामान्य कार्यकर्ता एखाद्या नेत्या विषयी बोलत असेल तर लगेच त्याला दुसरा कार्यकर्ता आंबेडकर द्रोही ठरवून आमचाच नेता कसा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे हे सांगण्याचा निरागस प्रयत्न करतो. थोडीसी सत्तेचे भुक बाजुला ठेवून विचारधारेवर विश्वास ठेवून काम केले तर सर्वांना पोटभर मिळेल हे माहिती असताना सुद्धा आप आपसातील वैर मा. मिटवण्यासाठी एकत्र येत नसतील तर नेत्यांना वैचारिक म्हणावच कसं हा प्रश्न चळवळीच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. आप आपसातील वाद मिटवून संवाद वाढविला तर आपण संविधानाचे रक्षण करू शकु नाहीतर आपल्या वर्तनातुन शत्रुची ताकद वाढतच आहे यात शंकाच नाही. आज कोणते नेतृत्व श्रेष्ठ आहे हे ठरवण्याचा काळ नसुन प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून काम करणे महत्त्वाचे आहे. स्वतः चे नेतृत्व सक्षम आहे अशा अविर्भावात राहुन चळवळी मध्ये व कामामध्ये आडकाढी न आणता आज प्रत्येकाने नेतृत्वातुन निवृत्ती घ्यावी व युवकांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. यातच खरे शहाणपण आहे.

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp