विकास नगर उदगीर येथे आदर्श शिक्षक मा.प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा वाढदिवस चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न
उदगीर / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : पी.टी.ए.चे उदगीर तालुका अध्यक्ष व इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा मा.प्रा.सिध्देश्वर पटणे यांचा वाढदिवस चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला, या वाढदिवसानिमित्त सहकारमहर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे व चंदरअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले. तसेच प्रा.जावेद शेख व आकाश मंगलगे यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रा.जामकर सर यांनी वाढदिवस सोहळ्याचे सूत्रसंचलन केले तर श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.
या वेळी बालाजी पाटील नेत्रगावकर,प्रा.दत्ता खंकरे,नंदु पटणे,झुंकलवाड सरपंच गुरधाळ, विशाल रंगवाळ, विश्वनाथ बिरादार कौळखेडकर, राजकुमार कपाळे ,संजय आडे,सय्यद शकिल , गणेश बिरादार, महेश नवाडे,कल्याण बिरादार,रमेश खंडोमलके, भास्कर जाधव, शिवशंकर खड्डे, विशाल हाळीकर ,जय सोनवणे,प्रा.चौधरी, संतोष सुर्यवंशी, झेरीकुंटे सर, ज्ञानोबा मुंडे, सुगावकर सर,जलमपुरे,सुगावे स्वामी , मनोज संगाने आदी मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होते.
