विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोब स्पर्धा परीक्षेची तयारी. करणे अत्यंत गरजेचे .
बालाजी सुवर्णकार गुरुजी यांचे मत.
उदगीर प्रतिनिधी.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आतापासूनच मोठे ध्येय गाठण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची गरज असल्याचे मत बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी व्यक्त केले. ते इयत्ता चौथीच्या वर्गात बंसल क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाली की दिवसेंदिवस अभ्यासक्रमामध्ये बदल होत असून येणारा अभ्यासक्रम हा भविष्यात सीबीसी पॅटर्न राहणार असून या सीबीसीच्या पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी खूप मेहनत चिकाटी आणि जिद्द ठेवून अभ्यास केला तर विद्यार्थी खूप मोठे संपादक करू शकतात असेही ते म्हणाले . यावेळी कु. भाग्यवंती भुसारे कु. प्रतीक्षा जाधव आदित्य पासामे नागेश बिरादार मंगेश हंबीर या विद्यार्थ्यांचा बालाजी सुवर्णकार गुरुजींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व अशाच पुढील स्पर्धा परीक्षेतून उज्वल यशासाठी साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देविदासराव औटे सचिव प्राध्यापक बाबुराव नवटके यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षकांनी या संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल सर्वत्र पालक वर्गात आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp