विळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अतरवली सराटी झालेल्या प्रकरणा बद्दल रस्ता रोको

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्त तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी विळेगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन विळेगाव येथे करण्यात आला,या वेळी या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात समाजातील सर्व लहानथोर नागरिकांचा सहभाग लाभला.या आंदोलनाला पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या हेतुसाठी उपस्तीथी होती,त्याच बरोबर जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक,तसेच मुकुंदराज विद्यालय विळेगाव चे सर्व शिक्षकांनी देखील यात सहभाग नोंदवला.
या वेळी काँग्रेस पार्टीचे देवणी तालुका अध्यक्ष श्री.अजितभाऊ बेळकोने व सकल मराठा समाज च्या वतीने जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही असे पत्रकारांना बोलताना माहिती दिली.या वेळी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणाही देण्यात आल्या मराठा समाजाला आरक्षण कधी व कसे भेटणार याची आतुरता सर्व जनतेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp