


विविध पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने उपोषण कर्त्यास पाठिंबा हालगी मोर्चा व रास्ता रोको बोरोळ चौकात चक्काजाम
देवणी नगर पंचायत समोर नगरसेवक अमित सुर्यवंशी यांच्या उपोषणासाठी समर्थन देण्यासाठी मुर्की चौक ते बोरोळ चौकात चक्काजाम करून नऊ संघटनेचे अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिले,
देवणी-प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी,नगर पंचायत देवणी येथे गेल्या साहवा दिवसापासून विविध विषयांच्या मागणीसाठी नगरसेवक अमित उर्फ बंटी सुर्यवंशी हे न. प. देवणी घनकचरा व्यावस्थापना अंतर्गत संबंधित स्वामी एजन्सी चे चौकशी करून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व कंत्राटी स्वच्छता कामगार यांना देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत देयक तपशील व पीएफ खाते रक्कम बाबत माहिती देण्यात यावी संबंधित कंत्राटाची एकूण रक्कम किती आहे याचा तपशील कंत्राटदार हे नगरपंचायत अंतर्गत कोणत्या अटी व शर्तीने काम करीत आहेत याचा तपशील मागण्यासाठी मागील सहावा दिवसापासून उपोषण करत आहेत आजचा उपोषणाचा साहवा दिवस असुन उपोषणाला समर्थनासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने हलकी मोर्चा रास्ता रोको बोरोळ चौकात चक्काजाम करून दिले जाहीर पाठिंबा या वेळी ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नामदेव कांबळे माजी नगरसेवक तथा मा, बाधकाम सभापती न,प,देवणी, वसंत बिबिनवरे,राजकुमार सस्तापुरे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष,अभंग सुर्यवंशी, मुकेश सुंडे,धनराज बिरादार,आविनाश कांबळे,प्रा, रतन सुर्यवंशी, दिपक स्वामी, सुशीलकुमार सुर्यवंशी, आवेश सुर्यवंशी,दशरथ कांबळे,गजानन गायकवाड,पत्रकार नरसिंग सुर्यवंशी, मोमीन सगर,लक्ष्मण रणदिवे,काशिनाथ मुंगे जयेश ढगे, सुनील कांबळे, ताजुद्दीन बुदलेघर,आदि सह मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्ता रोको बोरोळ चौकात चक्काजाम करून यावेळी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अमित सुर्यवंशी यांनी रास्ता रोको बोरोळ चौकात बोलताना सांगितले कि माझा उपोषणाचा सहावा दिवस असुन मला न्याय मिळेपर्यंत व एजन्सी काळ्या यादीत टाकल्या शिवाय गप्प बसणार नाही व उपोषण मागे घेणार नाही आशा व्यक्त केले,गणेश घाळे, गजेंद्र कांबळे, देविदास सुर्यवंशी, विलास सुर्यवंशी,रमेश गायकवाड, सुखंवत रणदिवे, ज्योतिराम रणदिवे, रमाकांत सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, प्रकाश पतंगे,आदिसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, पोलीस बंदोबस्त चौक ठेवण्यात आले देवणी पोलीस निरीक्षक कृष्णकांत गुट्टे, नारायण डप्पडवाड, विनायक कांबळे, श्रीराम आगलावे, कलवले व्ही,डी, उस्तुर्गे एन बी, मानवर एम व्ही, सूर्यवंशी के,पी, तलाठी लक्ष्मण कांबळे मंडळधिकारी ढगे मॕडम,यांनी सहकार्य केले व आभार ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी मानले,