विश्वकर्मा समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा

वधुवर परिचय मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन

लातूर / प्रतिनिधी :विश्वकर्मा समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा येत्या 10 एप्रिल 2022 रोजी विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून जगात भयानक परिस्थिती कोव्हिड रोगाने निर्माण केली होती. त्यामुळे भारतात लौकडाऊन लावल्याने सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात आनेक समस्या निर्माण झाल्या आणी जगणे मुस्किल होऊन बसले आशा परिस्थितीत सामान्य माणसाला कौटुंबिक स्थैर्य मिळावे म्हणून वधुवर परिचय मेळाव्यात लग्न जमवल्यास आई- वडिलांना वेळ व आर्थिक ताण पडणार नाही आपल्या पाल्यांना घरबसल्या स्थळ मिळाल्याचा आनंद होईल. म्हणून विश्वकर्मा बांधवांसाठी विश्वकर्मा समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.तेंव्हा विश्वकर्मा समाजातील विवाह इच्छुक असलेले ,डॉक्टर, इंजिनिअर ,सायन्स ,कॉमर्स, पदवीधर ,क्षेत्रातील नोकरी व व्यवसाय करणारे मुले व मुली व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या मुला – मुलीचे विवाह करण्यास योग्य स्थळ आपल्याला येथे उपलब्ध होईल त्यासाठी प्रत्येक वधुवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.सदर वधुवर परिचय मेळाव्यात भाग घेणाऱ्या बंधू आणि भगिनींनी नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क करावेत श्री अनंत पांचाळ 9850641554, श्री सुदर्शन बोराडे 7588018828 आसे आवाहन विश्वकर्मावंशीय समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp