भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती श्रमिक हक अभियान च्या वतीने राष्ट्रीय कार्यालयात साजरी
देवणी / प्रतिनिधी : दिनांक 14/ 4 /2023 रोजी सिद्धार्थ नगर देवणी येथील श्रमिक हक्क अभियान एनसीडीएचआर भारत या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यालयाच्या भव्य प्रांगणात दिपाने, धुपाने, पूजन, प्रतिमेचा व संविधानाचे करून निळ्या झेंड्याला सलामी देऊन सामूहिक वंदना घेऊन संविधान प्रस्ताविकेचा सामुदायिक वाचणे करून अभिवादन करून जयंती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आयु. दशरथ कांबळे (भाऊ) हे भूषविले
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमान नागेशजी जीवने यांच्या हस्ते करण्यात आले तर संविधानाचे पूजन दशरथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले
निळ्या झेंडावंदनाचा कार्यक्रम हा मुजीब शेख तालुका अध्यक्ष (बहुजन मुक्ती पार्टी) यांच्या हस्ते करण्यात आले.
या पवित्र प्रसंगी प्रमुख मान्यवरांची
विशेष उपस्थिती देवणी पोलीस ठाण्याचे बीट अमलदार श्रीमान विनायक कांबळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी पुजारी ,वसंत कांबळे, पांडुरंग कदम, गुलाब शेख ,मुजीब तांबोळी ,देवदास सूर्यवंशी (माजी सरपंच) हंचनाळ, रमेश गायकवाड ,मारुतीराव मामा संगीत मास्टर अजनी, भीमराज गायकवाड, राजकुमार गायकवाड, नंदकुमार शिंदे, शिवाजी साळुंखे, हरिश्चंद्र बुकटे, राजाराम माने, सिताराम माने, अशोक सूर्यवंशी संगमकर, सौ अनिताताई कांबळे महिला आघाडीच्या प्रमुख, कुमारी प्रज्ञाताई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित
होते आभार पर बोलताना आयु. ज्ञानेश्वर (भाऊ) सूर्यवंशी म्हणाले महापुरुषांच्या विचाराचा वापर जगण्यासाठी होतोय पण वागण्यासाठी होत नाही ते होणे गरजेचे आहे तरच जयंतीची सार्थक होईल
असे ठणकावून सांगितले सर्व महापुरुषांच्या घोषणाने व संविधानाच्या घोषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जय भीम, जय संविधान, जय भारत.

