सावरगाव ग्रामदैवत उद्देश्वर, उद्देश्वर यात्रा उत्सव निमित्त ‘ वैरी झाले रक्ताचे ‘ या नाटकाचा प्रयोग.


देवणी( प्रतिनिधी ) सावरगाव चे ग्रामदैवत श्री उद्देश्वर यांच्या132 या यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक12/04/2022 मंगळवार नाटकाचा पहिला प्रयोग व 13/04/2022 रोजी बुधवार रात्री सर्व माता-भगीनीच्या पंचारती तील दिव्याला साक्ष ठेवून12 दिवसा आकाशात डोमा न डोलणाऱ्या उदेश्व राच्या कावडीच्या लग्नानंतर 9.00 वाजता या नाटकाचा दुसरा प्रयोग सादर होणार आहे.
गेले 132 वर्षाची नाटकाची परंपरा असलेले सावरगाव. प्रत्येक घरात नाटकांमध्ये भाग घेतलेला कलाकार. ही परंपरा कोरोनाचे वर्ष वगळता अखंड चालू आहे. ऐतिहासिक नाटकं ‘ जावळीचा रणझुंजार ‘ असो किंवा सामाजिक ‘सरपंच खूनी पाटील बै मा नी, आईचा आशीर्वाद. इत्यादी. या आधुनिक माध्यमाच्या युगात नाट्य रुपी परंपरा टिकून आहे.
दिनांक13/04/2022 रोजी पहाटे चार वाजता उद्देश्वर महा पालखी चे भव्य मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणे निघणार आहे. उदेश्वर युवक मंडळ, उदेश्वर यात्रा महोत्सव समिती व समस्त गावकरी सावरगाव यांच्या वतीने सर्व परिसरातील नागरिकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp