शेख युनुस / संगमनेर : तालूक्यातील आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघातील शिंदोडी येथील सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांनी मा.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेर सहकारी साखर कारखाना संचालक आणि आदर्श सरपंच मा.शंकरराव पाटील खेमनर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिंदोडी येथील सरपंच खामकर एकनाथ (मेजर) तसेच सामाजिक कार्यकर्त( आधारस्तंभ, अध्यक्ष) उपसरपंच पोपट सोमाजी कुदनर यांच्या उपस्थितीत ,सहकार्याने,मेहनतीने भरघोस मते मिळवून शेतकरी मंडळाचा दणदणीत विजय मिळवून तेरा ते तेरा उमेदवार बहुमताने विजयी झाले. यामध्ये भिमराज बापू कुदनर,बाबुलाल आब्बास शेख,सखाराम दरू कुदनर,रावसाहेब कुदनर(भगत),विठ्ठल तबाजी नाईकवाडी(सर),महादु जबा कुदनर,परशूराम भाऊसाहेब कुदनर,सखाराम सिदू माने उत्तम सऱ्याबापू कुदनर,संजय शिवाजी बागुल,म्हतू मना कुदनर,सौ.हौशाबाई नारायण कुदनर,आणि सौ.मंगल राजेंद्र कुदनर हे उमेदवार शेतकरी मंडळाळात बहुमताने विजयी झाले. या विजयानंतर शिंदोडी गावात जावून हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ,गुलाल उधळून विजयी झाल्याचा आनंद समस्थ ग्रामस्थ, गांवकरी ,महिला आणि मतदारांना अन्नदान, भोजन व बहूमोल आभार व्यक्त करून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त हनुमंता सखाराम खेमनर ,शंकरराव हनुमंता खेमनर (आदर्श सरपंच),जिल्हा परिषद सदस्या मिराताई शेटे ,रफिक शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच पत्रकार शेख युनुस, पत्रकार सोनवणे ,पत्रकार रमजान शेख , पत्रकार राहुल कुदनर फोटोग्राफर शिंदे संतोष यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टेंश,मास्क,सेनिटायझर आदि गोष्टी लक्षात घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp