शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मा, महेश पालकर साहेब पुणे यांना प्रेरक संघटनेचे निवेदन
दहा जिल्हाचा प्रस्ताव लवकरात लवकर आल्यास आपण
त्वरीत मानधन काढण्याचे दिले आश्वासन
देवणी प्रतिनिधी रणदिवे लक्ष्मण
निलंगा तालुका साक्षर भारत प्रेरक संघटनेच्या वतीने दिनांक १७/०३/२०२३ रोजी मा, डॉ.महेश पालकर शिक्षण संचालक साहेब शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना श्री.भगवानरावजी देशमुख साहेब,श्री.दत्ताजी देशमुख साहेब, व लातूर जिल्हाध्यक्ष भुजंग अर्जुने, नांदेड जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे,बीड जिल्हाध्यक्ष गणेश काळे, जालना जिल्हाध्यक्ष गणेश एडके, जिल्हाध्यक्ष परभणी रामकृष्ण बचाटे, जिल्हाध्यक्ष हिंगोली रुपेश पतंगे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष स्वामीराज भोर,गोंदिया जिल्हाध्यक्ष सुजित गेडाम, जिल्हाध्यक्ष गडचिरोली मिथुन बांबोळे यांच्या नेतृत्वाखाली मानधन व इतर मागण्याची निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर स्वाक्षऱ्या प्रकाश घोरपडे निलंगा तालुकाध्यक्ष, सुरेश कामत उदगिर तालुकाध्यक्ष, चोपडे बाबासाहेब,यासह मानधनासाठी अहोरात्र काम करणारे रणदिवे लक्ष्मण, रामदास कदम, उद्धव दुवे, अनेक प्रेरक प्रेरिका यांच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी लढत आहेत, तरी आपल्या प्ररेक प्रेरिकाच्या वतीने मा, डॉ महेश पालकर शिक्षण संचालक पुणे यांना भेटून निवेदन देण्यात आले,व दहा जिल्ह्यातील प्रस्ताव लवकरात लवकर पाठवुन द्यावे हि नम्रतेची विनंती करण्यात येत आहे,