प्रगतशील शेतकरी कर्मयोगी किशनराव राठोड यांचे निधन…
मुखेड / प्रतिनिधी : तालुक्यातील वाडी-तांड्यावरील मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत आशी मनाशी खूनगाठ बांधून विमुक्त जाती सेवा समितीच्या माध्यमातून संबंध तालुक्यातील जिल्ह्यातील बहुजनांच्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा बहुजन नायक कै. वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगरच्या माध्यमातून आनेक शैक्षणिक संकुलातून हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आखे आयुष्य वेचनारे खरे शिक्षणमहर्षी कर्मयोगी किशनराव राठोड होत.त्यांनी व त्यांचे बंधू कै.गोविंदराव राठोड यांनी मिळून शिक्षणाचे रोपटे लावले होते त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. व्यक्ती मोठी झाल्यावर माणूस म्हणून सर्व सामान्य जिवन जगणारे किशनराव राठोड हे अव्वल दर्जाचे प्रगतशील शेतकरी होते.कारण त्यांनी आपल्या संकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरचा ताजा भाजीपाला खायला भेटावा व त्यांचे आयुष्य निरोगी रहावे म्हणून स्वतः शेतीवर राबत आसे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात जास्ती चे उत्पादन काढणारे एकमेव शेतकरी होते.शेतकऱ्यांचे जिवन ते स्वतः उपभोगत होते.शेती आणि मातीशी नातं कायम जिवंत ठेवण्यासाठी साधी राहणी उच्च विचार आसणारे महाराष्ट्रातील ना.धो.महानोर यांच्या नंतर दुसरे विधान परिषद सदस्य म्हणून परिचित होते. राठोड साहेबांच्या संकुलात शिकलेले विद्यार्थी शिक्षक,हेडमास्तर, तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस आधिकारी, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जि.प.सदस्य, सभापती, जि.प.अध्यक्ष,आमदार आदी पदापर्यंत पोहचले.म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केल्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्या जाण्याने शिक्षणाचा आधारवड कोलमडून गेल्याची गत निर्माण झाली आहे. शिक्षणाची गंगा आटली आहे..शिक्षणाचा आलेख थांबला आहे. शैक्षणिक चळवळ थांबली आहे. शिक्षणाचे घर उदास झाले आहे. शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी कर्मचारी व कार्यकर्ते यांतील नवचैतन्य हारपले,लोपले कोमेजले आसे चित्र निर्माण झाले आहे.आसे व्यक्तीमत्व पुन्हा होने नाही..
राष्ट्रीय होलार समाज संघाच्या वतीने व बि मिडिया माध्यम समुहाचा संपादक तथा संचालक या नात्याने साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो..!!

नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी विधान परिषद सदस्य तथा मराठवाड्यात शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवणारे विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगरचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड यांचे दुःखद निधन आज रात्री 1.00 वाजता हैद्राबाद येथील खाजगी रूग्णालयात झाले.ते मागील एक महिन्यापासून येथे उपचार घेत होते.
त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कंधार फाटा, कमळेवाडी ता. मुखेड जि. नांदेड येथे होणार आहे.
त्यांच्या निधनाने राठोड परिवार व व विमुक्त जाती सेवा समिती वसंनगरच्या सर्व परिवारावर तसेच नांदेड जिल्ह्यावर शोककाळा पसरली असून ईश्वर राठोड परिवाराला या दुखातून सावरण्याचे बळ देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.