
उदगीर / प्रतिनिधी : गाव कुमठा या ठिकाणी समृद्धी ऑरगॅनिक फार्म प्रायव्हेट लिमिटेड पुणे.अंतर्गत जैविक शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला कंपनीचे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर (MD)माननीय प्रशांतजी मोरणकर व मॅनेजर सचिनजी मेसारे, धीरजजी पाटील व भास्करजी घवाने (ट्रेनिंग ऑफिसर )यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक शेती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीचे ब्रीद वाक्य (सेंद्रिय खा निरोगी राहा!)असे शेतकऱ्यांना सांगितले . प्रशिक्षणादरम्यान दिपक धनशेट्टे (AFO)यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षण कार्यक्रमात कंपनीचे अभिजित राठोड (AFO ), धीरज पाटील (AFO)यांनीही मार्गदर्शन केले भारतामध्ये जैविक शेतीचे मोठ्या प्रमाणात फायदे व जैविक शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी 5%लिंबोळी अर्क कसे बनवावे. दशपर्णी अर्क, निंबोळी पेंड, जीवामृत, गोकृपा अमृत, ताम्र ताक, बेल रस कशे बनवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले व त्याच प्रमाणे कंपनीचे (MD)प्रशांतजी मोरणकर यांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर उपाय योजना राबवत आहेत. तसेच जैविक उत्पादनाच्या खरेदीसाठी जिल्हा ठिकाणी शेतकरी खरेदी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहेत असे सांगितले. त्याचप्रमाणे संपूर्ण जगभरातून सेंद्रिय उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत चाली आहे याचा शेतकरी बांधवानी फायदा घेणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले.कंपनी बद्दल पूर्ण माहिती देण्यात आली. तसेच सदरील शेतकऱ्याचे 6 एकर सिताफळ ची बाग पूर्ण सेंद्रिय आहे. तिथे शेतकऱ्यांची सीताफळ बागेची शेतीशाळा घेण्यात आली.या प्रशिक्षण अंतर्गत 35 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.