1)क्लोरमेक्वाट क्लोराईड —:: वाढ निंयञक
2)एन ए ए —:: नैसर्गीक गळ थांबवीणे
3)जि ए –:: पेशीची संख्या वआकार वाढविणे
4)नायट्रोबेंझीन —:: कळी व फुले काढणे
5)टायकंटेनाॅल–:: प्रकाश सश्लेषण वाढविणे. . …… .
6)ह्युमिक अॅसीड 6% –:: सुपीकता वाढविणे ,
7)ह्युमिक अॅसिड 12 %वर –:: पाढ-या मुळाची वाढ …….
8)बायो स्टिमुलंट–:: नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे ….
9)सुक्ष्म अन्नद्रव्ये –:: पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे …….
10)स्टिकर –:: पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.. …….
11)अमिनो अॅसीड–:: हिरवे व कोवळेपणा वाढविणे
12)अँन्टीआॅक्सीडंट–:: झाडाला तारूण्य वाढविणे… …. .
13)प्रथम अन्नद्रव्ये –:: नञ, स्फुरद, पालाश ..
14)दुय्यमअन्नद्रव्ये–:: मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक
NPK:- नत्र-स्फुरद-पालाश
19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी
12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी
18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.
🌿
हे माहीत आहे का?
मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ
विद्राव्य खतांचे कार्य…
🌿 १९:१९:१९, २०:२०:२०
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.
🌿 १२:६१:०
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.
🌿 ०:५२:३४
या खतास मोनो पोटॅशियम म्हणतात.