शेख युनुस राहुरी / प्रतिनिधी : तालूक्यातील असलेल्या पश्चिमेला शेरी चिखलठाण येथील शेरी या ठिकाणीं असलेल्याअंगणवाडीमध्ये (क्र.६०) येथे पल्स पोलीओ लसीकरण करण्यात आले.पोलीओ लस ही आवश्यक असून ती काळाची गरज आहे कारण पोलीओ अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही* २०१२ पासून भारत पोलीओमुक्त घोषीत करण्यात आला आहेपरंतु काही एक दोन देशामध्ये हा पोलीओ विषाणू सक्रिय असल्याची माहिती आहे.त्यामुळेंराज्यात अनेक ठिकाणीं पोलीओ लसीकरण अभियान राबवण्यात आलेआले असून त्या नुसार शेरी येथील अंगणवाडीमध्ये पल्स पोलीओ लसीकरण दिवसाच्या निमित्ताने शेरी,चिखलठाण, बोंबीलदरा,कुरणदरा,वाळू वस्ती इत्यादि ठिकाणाहुन पाच वर्ष आणि त्या खालील बालकांना लसीकरण करून कुठलाही बालक हा या पोलीस अभियानापासून वंचित नाही राहणार याची दक्षता घेऊन येथील असलेल्या अंगणवाडीमधील सेविका,मदतनीस,आरोग्य सेविका ह्या जिवापाड प्रयत्नं करून पोलीओ लसीकरण दिवस हा पोलीओ रविवार तसच पल्स पोलीओ दिवस यशस्वी रित्या बालकांना पोलीओचंइंजेक्शन दिलं जात आणि प्रत्येक वेळी लहान बालकांना तोंडी पोलिओच्या स्वरुपात पोलीओचं औषध दिलं जात*. *यावेळीं डॉक्टर संसारे,डॉक्टर तांबे,आरोग्य सेविका नूतन गायकवाड़* अंगणवाडी सेविका सौ.काकडे मंगल ,मदतनीस सौ.बिस्मिल्ला शेखव पाच वर्ष पर्यततील आणि पाच वर्षाखालील बालक माता भगिनी उपस्थिति राहून पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वी राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp