कमलेश सुतार आणि “लोकशाही न्यूज”
चॅनलचं मनापासून अभिनंदन..
शेवटी सत्याचा विजय झाला..

मुंबई : किरीट सोमय्याची बातमी दाखवल्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 72 तासांसाठी “लोकशाही न्यूज” चॅनल बंद करण्याचे आदेश दिले होते.. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात लोकशाही नयूजने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.. आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश रद्द करून चॅनल आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू करण्याची परवानगी दिली.
हा सत्याचा विजय आहे असं मला वाटतं..
माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न देशात होतो आहे.. न्यायालयाचा आजचा आदेश माध्यम स्वातंत्र्याचा संकोच करणारया प्रवृत्तींना सणसणीत चपराक आहे.. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो..

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई