उदगीर / प्रतिनिधी (विजयकुमार बंडे) : श्रीमती श्यामला दिगंबराव पाटील यांना पंचायत समिती उदगीर च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव राज्यमंत्री आदरणीय ना श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुल केंद्रे,पंचायत समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव मुळे, उपसभापती श्री.बाळासाहेब मर्ल्लापले, जिल्हा परिषद सदस्य श्री. ज्ञानेश्वर पाटील गटविकास अधिकारी श्री.महेश सुळे, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती उदगीर सदस्य आदी तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.