श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी
देवणी / प्रतिनिधी : आज दि.14 एप्रिल रोजी श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमा पुजन व संविधान वाचन करण्यात आले.
याप्रसंगी मुअ. सुनील क्षीरसागर , स.शि. विनोद माने, ज्ञानोबा रामासने, मोईन सौदागर, भाऊराव बिरादार, अमोल भोसले, राजकुमार पटवारी, बालाजी शिंदे,लिपिक सौ. मिनाक्षी क्षीरसागर, दत्तात्रय बिरादार, समाधान कांबळे यांनी डॉ. आंबेडकरयांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.