श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा
देवणी / प्रतिनिधी : श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुअ. श्री सुनील क्षीरसागर, सहशिक्षक श्री विनोद माने, श्री ज्ञानोबा रामासने, श्री मोईन सौदागर, श्री अमोल भोसले, श्री बालाजी शिंदे, श्री राजकुमार पटवारी, श्री गंगाधर कोयले व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री दत्तात्रय बिरादार बांधवांनी प्रतिमेचे पुजन करून श्रीफळ फोडून अभिवादन केले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून त्यांच्या कार्या विषयी विचार व्यक्त केले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर नाटिका सादरीकरण करण्यात आली. विद्यार्थ्यांना श्री गंगाधर कोयले, श्री मोईन सौदागर व अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री सुनील क्षीरसागर यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोईन सौदागर यांनी केले.