देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी — तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धा मध्ये श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील १७ वर्ष वयोगटातून आदित्य विजयकुमार निरुडे व व्यंकटेश बाळू गरड या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून यांची जिल्हा स्तरावर निवड झाली.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री यशवंतराव पाटील,सह सचिव श्री अभिजीत पाटील, कोषाध्यक्ष श्री आदित्य पाटील, शाळेचे प्राचार्य हरकंचे आर.एम. यांनी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक श्री घोणसे ए.बी.यांचे सर्वांनी देवणी परिसरातील विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वानी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.