मा.धम्मज्योती गजभिये यांच्या पुढकाराने चर्मकार समाचा होणार सर्वांगीण विकास
मुंबई : आनेक वर्षापासून चर्मकार समाजातील चांभार, होलार, ढोर,मोची या चार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाने संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाची स्थापना करण्यात आली. परंतु आता पर्यंत या समाजाला विकास प्रवाहात आणण्यासाठी समाजाभिमुख प्रशासकीय अधिकारी लाभला नाही परंतु नुकतेच सामाजिक न्याय विभागातील बार्टी या संस्थेत आमुलाग्र बदल घडवून आनूसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करून सदर संस्था नावारुपाला आनण्याचे कार्य करणारे मा.धम्मंज्योती गजभिये साहेब या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार घेतला आहे. त्या दिवसापासूनच या लिडकौम महामंडळाचा चांगला आभ्यास करून सर्व समाजातील वंचित घटकांना समान न्याय या तत्वाने भारतीय संविधानानूसार कार्यरत आहेत.त्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे..



त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे उत्थान करण्यासाठी केंद्राच्या विविध यंत्रणांशी चर्चा करण्यात आली .
यात केंद्रीय चर्म संशोधन संस्था चेन्नई सोबत महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचे सर्वंकष सर्वक्षण करण्याबाबत , क्लस्टर धोरण ठरवण्यासाठी अभ्यासगट नेमण्याबाबत तसेच इतर राज्यातील चांगल्या धोरणांना महाराष्ट्रात स्वीकारण्यासाठी शिफारस करण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शविण्यात आली .
याबरोबरच काऊन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट , केंद्रीय पादुका प्रशिक्षण संस्था , लेदर सेक्टर स्किल काऊन्सिल इत्यादी संस्थांशी देखील विविध विषयांवर करार करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली .
“लवकरच या सर्व प्रस्तावांवर कार्यवाही सुरु होणार असून याद्वारे सुवर्णजयंती वर्षात मोठ्या प्रमाणात चर्मकार समाजाचे उत्थान करण्याचा लिडकॉम चा प्रयत्न यशस्वी होईल अशी आशा आहे “
व्यवस्थापकीय संचालक
लिडकॉम