राष्ट्रीय होलार समाज संघ पदाधिकाऱ्यांनी दिले मागण्यांचे निवेदन

देवणी / प्रतिनिधी : संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नुकतेच विराजमान झालेले कर्तव्य दक्ष आधिकारी म्हणून बार्टी सारख्या संस्थेचा चेहरामोहरा बदलून नवा आयाम देणारे धम्मंज्योती गजभिये यांचा सत्कार राष्ट्रीय होलार समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा अग्रो इंडिया चे संपादक बालाजी टाळीकोटे व शिष्टमंडळाच्या वतीने “क्रषीतज्ञ डॉ बी.आर.आंबेडकर विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी पत्रकार जाकिर बागवान,सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य नागनाथअण्णा गडिमे,बालाजी तोंडारे,बापूराव टाळीकोटे, राजेंद्र देवकत्ते, सावन ऐवळे,मुकेश होनमाने आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकारने सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून चांभार, होलार, ढोर,मोची या चार चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. परंतु जात निहाय लोकसंख्येच्या प्रमाणात विकासासाठी कर्ज, अनूदान देने क्रमप्राप्त होते.परंतु स्थापने पासून ते आज पर्यंत होलार समाजाला या महामंडळाच्या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. या समाजातील युवकांना, महिलांना रोजगार नाही त्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागते आहे. यामुळे लहान मुलाबाळांच्या शिक्षणाची आभाळ होत आहे. शिक्षणाचे प्रमाण नगन्य आहे. आज्ञान,अंधश्रद्धा, जूनाटचालीरिती मध्ये आडकलेल्या समाजाकडे नेतृत्व तयार होऊ शकले नाही.महामंडळावर आद्याप पर्यंत संचालक म्हणून सुध्दा निवड नाही. एकंदर विकासाच्या बाबतीत शेवटच्या टोकावर आहे.होलार समाजातील प्रज्ञावंतांनी पुढे येत राष्ट्रीय होलार समाज संघाच्या माध्यमातून होलार समाजाचा आता पर्यंतचा राहिलेला आनुषेश भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या न्याय मागण्या मान्य करून घेण्यासाठी लिडकौमचे व्यवस्थापकीय संचालक अभ्यासू व्यक्तीमत्व धम्मज्योती गजभिये यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. या वेळी व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी होलार समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.व समाजाच्या उन्नतीसाठी संघाने करीत आसलेले कार्य आणि या पदावर आल्यापासून पहिल्यांदाच राष्ट्रीय होलार समाज संघाच्या वतीने सत्कार गौरव केल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp