उदगीर / प्रतिनिधी : उदगीर येथील नव्यादिशा वृत्तपत्राचे संपादक राजीव किनीकर यांना जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार राज्य मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्र चालवण्याचा कसलाच वारसा नसताना गेली नऊ वर्षांपासून नव्यादिशा वृत्तपत्र नियमित प्रकाशित करून सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या लेखनीच्या माध्यमातून उल्लेखनीय असे कार्य केले आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा 2021चा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर येथे रविवार दि.२४ ऑक्टोबर रोजी रघुकुल मंगल कार्यालयात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरचे अध्यक्ष शिवश्री प्रा. विवेक सुकणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेटटी, तहसीलदार रामेश्वर गोरे, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा अध्यक्ष रोहन जाधव, मादलापूरचे सरपंच उदय मुंडकर राष्ट्रवादीचे समीर शेख, नगरसेवक ताहेर हुसेन, नवनाथ गायकवाड, उदगीरचे उद्योगपती बिपीन पाटील, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा सचिव मारोती जाधव, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंद शेळके, मराठा सेवा संघाचे उदगीर तालुका अध्यक्ष शिवश्री प्रदीप ढगे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp