प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

जळकोट — संघर्षमय जीवनावर मात करुन सन्मानाने जगण्याचा निर्धार करुन सम दुखी समविचारी एकल महिलांनी एकजुटीतुन उभारलेल्या एकल महिला संघटना जळकोटनेच्या वतीने महिला व एकल महिला चा जीवन संघर्ष व त्यावर उपाय या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते,भारतिय संविधान हा देशाचा आत्मा आसुन त्यांनी एकल महिलांना सुध्दा सन्मानाने जगण्याचा आधिकार दिला आहे,हे भारत देशाचे पवित्र संविधान आपली जन्मा पासुन मृत्यु पर्यंत काळजी घेऊन रक्षण करते आसे वक्तव्य श्रमीक क्रांती आभियानाचे मारुती गुंडीले यांनी केले ते पुढे म्हणाले,या संविधान संवर्धंनाची व रक्षणाची जिम्मेदारी आपल्यावर आसुन संविधनाने दिलेले मुल्य हे महिलांच्या जीवन सुरक्षा व उन्नतीचा मार्ग आहे आसे ही ते म्हणाले ते पुढे म्हणाले,,भारतातल्या प्रत्येक व्यक्ती जीवनावर ही संविधानिक मुल्य चांगला प्रभाव टाकुन माणसा माणसातील भेद नष्ट करुन देशात बंधुभावाची जोपासना करतात.देशाची एकता व एकात्मता टिकवुन ठेवण्याचे महान कार्य भारतिय संविधानांने केले आसल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.एवढे महान संविधान आपल्या देशाला लाभले आसुन ही रुढी व परंपरा टिकवुन ठेऊ पहाणारी व विषमतेचं समर्थन करणारी मानसिकता या माझ्या प्रिय भारतातील काही लोकात निर्माण झाली आसल्याचे दुख ही त्यांनी यावेळी व्यक्त केले आशा लोकांच्या विचारात बदल घडवुन त्यांना संविधान सवर्धंनाच्या कामी उपयोगात आणुन त्यांना समतेचा मार्ग दाखवावे,प्रत्येक घरात संविधानाची प्रत आसावी व ती वाचन करावी आशी आशा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली,या सत्राचे आयोजन मीना वाघमारे,आश्विनी वाघमारे यांनी जळकोट पंचायत सभागृहात दि.१५/३/२०२४ रोजी शुक्रवार या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,प्रथम मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गुडसुरे कार्यक्रमाच्या शेवटी सविधान उद्देशिका वाचुन संविधान संवर्धंन रक्षणाची शपथ ही घेण्यात आली,या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी गुडसुरे,सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच गव्हाण हे होते तर कासा मुंबई चे वैजनाथ डावकरे,शितलताई गोस्वामी,विष्णु आदावळे, सुजाता वाघमारे,संग्राम नामवाड,हरिभाऊ राठोड,शारदाताई मुंगे,पत्रकार आविनश तोगरे,लक्ष्मण रणदिवे मारुती सुर्यवंशी,शांताबाई बिजले,पोर्णिमा सोनकांबळे,नीता खोब्रागडे,मंगलताई सोनकांबळे शोभा तोगरे,सुमनबाई सोनकांबळे,शकुंतला कांबळे,इत्यादी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष गायकवाड,यांनी केले तर मारुती गुंडीले यानी आभार व्यक्त केले.