न्यायासाठी आजाद मैदानावर रा.प.कर्मचाऱ्यांचे 15 दिवसापासून अमरण उपोषण..
मुंबई / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या बडतर्फ ३५० कर्मचाऱ्यांचे आरक्षणाचे जणक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनापासून आजाद मैदानावर अमरण उपोषण सुरू करण्यात आले. आसून आद्याप पर्यंत प्रशासन, सरकार, आमदार, मंत्री यांनी दखल घेतली नसल्याची खंत महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.


गेल्या आनेक वर्षांपासून रा.प.महामंडळाच्या माध्यमातून सर्व सामान्य प्रवाशांच्या सेवेत दिवस रात्र राबणारे कर्मचारी गेल्या आनेक दिवसापासून घरी बसवल्यामुळे एकंदरीत मुलंबाळं कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे उपासमारीला सामोरे जावे लागते आहे. किरकोळ कारणावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणे.व
2016 मध्ये जसे कुटुंब सुरक्षा योजना लागू केली त्या प्रमाणे आता पण सदर निर्णय घेण्यात यावे.व आशा विविध मागण्यांचा विचार करावा म्हणून
26.06.2023. पासून आझादमैदान येथे आमरण उपोषण करत आहोत. आज वयाच्या 40 व्या वर्षी कामावरून कमी करणे म्हणजे खूप मोठ संकट आहे. घरच्या जबाबदारी खाली अगोदरच वाकलेले कामगार त्यामध्ये हातातून काम गेल्यावर काय अवस्था आसेल. अशा खूप मोट्या संकटाला समोर जावे लागणार आहे. या मध्ये मा.मुख्यमंत्री साहेबांनी कमीत कमी आमच्या मुला बाळांचा तरी विचार करून आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे. आज आमचे कुटुंब उद्वस्त होण्यापासून वाचवावे.आमच्या कडून जो अपहार घडला आहे तो केलेला नसून तो अनावधानाने घडला आसल्याची कबुली ही उपस्थित कर्मचा-यांनी व्यक्त केले आहे.नैसर्गिक न्यायाच्या भावनेने एक संधी देण्याची विनंती सर्व आन्यायग्रस्त उपोषणार्थी कर्मचाऱ्यांनी निवेनाद्वारे एक संधी देण्याची विनंती केले आहे. या निवेदनावर सर्व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.