संवैधानिक मूल्ये मूल्यशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आवश्यक! :- प्रा. किरण भोसले.
चंदगड : ‘शाळा व हाईस्कूलमधुन मूल्यशिक्षणातुन संवैधानिक मूल्ये रुजवणे आवश्यक आहे. त्याशिवाय महामानवांच्या स्वप्नातील समाजव्यवस्था निर्माण होणार नाही. ही व्यवस्था निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षक म्हणून आपलीच आहे ती पेलण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे’, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. किरण भोसले यांनी केले. ते कास्ट्राइब शिक्षक संघटना शाखा चंदगड मार्फत आयोजित तालुकास्तरीय अधिवेशनामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत चंदगड तालुका सरचिटनिस मा. विनायक प्रधान यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मा. गौतम वर्धन होते, चंदगड तालुका अध्यक्ष मा. संतु कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अनेक शिक्षक व शाळांना पुरस्कार देवून सम्मानित करण्यात आले. प्रमुख उपस्थितीत जिल्हा सरचिटनिस मा. संजय कुर्डूकर, माजी सभापती एड. अनंत कांबळे, गटविकास अधिकारी मा. बाळासाहेब भोजे, विस्तार अधिकारी मा. सुनीता चंद्रमणी तसेच मा. आयु. जी. व्ही. दैठणकर मा.शि.वि. अधिकारी, चंदगड, मा. आयु. ना. वि. कांबळे मा.शि.वि. अधिकारी, चंदगड, मा. आयु. ब. धों. कांबळे मा.शि.वि. अधिकारी, चंदगड, मा. आयु. विलास ग. कांबळे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख चंदगड, मा. आयु. वाय. आर. निदूरकर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख कोवाड, मा. आयु. द. य. कांबळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, मा. आयु. ग. रा. कांबळे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा चंदगड, मा. आयु. यशवंत कांबळे, मा. आयु. डी. टी. कांबळे सेवानिवृत्त केंद्र प्रमुख दाटे, मा. आयु. तानाजी घस्ते शिक्षक नेते, मा. आयु. यशवंत सरदेसाई शिक्षक नेते, मा. आयु. तुकाराम संघवी जिल्हा कार्याध्यक्ष, मा. आयु. पी. डी. सरदेसाई जिल्हा कोषाध्यक्ष, मा. आयु. एम. एस. कांबळे उपाध्यक्ष, मा. आयु. आनंदा मा. कांबळे अध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना चंदगड, मा. श्री. धनाजी कृ. पाटील अध्यक्ष, शिक्षक समिती चंदगड, मा. श्री. नारायण वि. पाटील शि. वि. अधिकारी, पं.स. शिरोळ, मा. श्री. बाबुराव धों. परीट संचालक, शिक्षक बँक कोल्हापूर, मा. श्री. सुनिल कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष, शिक्षक समिती, मा. श्री. राजाराम जोशी चेअरमन, प्राथ. शिक्षक पतसंस्था चंदगड, मा. श्री. प्रकाश वि. पाटील अध्यक्ष, पं.स. स्तरावरील पतसंस्था चंदगड, मा. श्री. महादेव धा. नाईक चेअरमन, शिक्षण सेवक पतसंस्था चंदगड, मा. श्री. शिवाजी शं. पाटील अध्यक्ष, शिक्षक संघ चंदगड, मा. श्री. सदानंद गा. पाटील अध्यक्ष, शिक्षक संघ चंदगड, मा. श्री. रविंद्र साबळे अध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना, चंदगड, मा. श्री. वसंत कृष्णा जोशीलकर अध्यक्ष, विरंगुळा केंद्र मजरे कारवे, मा. श्री. गोपाळ जगताप केंद्रप्रमुख, मा. श्री. बाळू प्रधान केंद्रप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

