सदानंद देशपांडे यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
उदगीर/ प्रतिनिधी : काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार उदगीर येथील देशपांडे कोचिंग क्लासेस व फिनिक्स इंग्लीश स्कूलचे संचालक सदानंद बालाजीराव देशपांडे विळेगावकर यांना पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुणे येथील एस.एम.जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त (शिक्षणाधिकारी ) पुणे श्री.अनिल गुंजाळ हे होते तर व्यासपीठावर पटकथालेखक, अभिनेते शशांक उदापुरकर, लक्ष्मीकमल गेडाम, उद्योजक प्रथमेश जंगम, मावळवार्ता फाउंडेशन चे अध्यक्ष नंदुभाऊ वाळंज, ज्येष्ठ कृषितज्ञ रश्मीकुमार अब्रोल, निमंत्रक साधनाताई पोहरे यांची उपस्तिथी होती. श्री.सदानंद देशपांडे हे विळेगाव येथील रहिवासी असून गेल्या दहा वर्षांपासून ते देशपांडे कोचिंग क्लासेस व फिनिक्स इंग्लीश स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य करतात. योग शिक्षक म्हणून ही ते आपली सेवा बजावतात.त्यांच्या एकूणच शैक्षणिक कार्याची नोंद घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे .