समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करण्यासाठी लढा द्यावा.
……..सुजाताताई खांडेकर
देवणी प्रतिनिधी
भारतिय संविधानाने समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,सामाजिक न्याय या सारखी आनमोल मुल्य भारताला दिले आसुन या मुल्याची जोपासणा झाली तर खर्या आर्थाने समतेवर आधारलेली समाज रचना निर्मितीचे आपले स्वप्न पुर्ण होईल त्या साठी संस्था संघठनेनी समतेवर आधारलेली समाज रचना निर्माण करणेसाठी विषमतेविरुद्द सनदशीर मार्गाने लढा द्यावा व तसेच निस्वार्थ नेतृत्व ही निर्माण करावे आसे वक्तव्य कोरो इंडिया या सामाजिक संस्थेच्या संचालिका डा.सुजाताताई खांडेकर यांनी केले,दि.११/६/२०२३पासुन तर दि.१४/६/२९२३ रोज पर्यंत औरगांबाद येथिल खुलताबाद येथिल स्पेस सेंटरवर घेण्यात आलेल्या ट्रेनिंग कार्यक्रमात शेवटच्या दिवशी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या केवळ दुर्बल वंचितांच्या कल्याण व विकासासाठीच आपली लढाई नाही तर त्यांचा विकास व कल्याण घडवुन आणण्यासाठी त्यांच्यात नेतृत्व विकसीत करणे हा आपला प्रमुख उद्देश्य आसला पाहिजे.ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व आसले पाहीजे आसे ही त्या बोलत होत्या,लोक कल्याणाची लढाई लोकांनीच सनदशीर मार्गाने लढवली पाहीजे,तरचं विषमता नष्ट होऊन समता प्रस्थापित होईल आसे ही त्या सांगत होत्या.या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्यातिल संस्था,संघटना प्रमुख प्रतिनीधी उपस्थीत होते बदलाची प्रक्रिया घडवत आसतांना आव्हाने समोर येतात त्यावेळी आपण यशाच्या दिशेने जात आहोत हे निश्चिंत आसे समजावे आसा संदेश ही त्यांनी कार्यकर्तेना यावेळी दिले. या कार्यक्रमात वेगवेगळ्या जिल्हयातुन आलेल्या स़स्था संघटनानी आप आपल्या भागातील समस्या मांडुन विचाराची देवाण घेवाण केले,महिलाएं मुलीवरील वरील आत्याचार.दलित आदिवासी व भटकते विमुक्त यांच्या हक्क आधिकारावर होत आसलेले आक्रमण यावर ही सविस्तार चर्चा करण्यात आली,समस्या विरुध्द कसे लढावे याची सविस्तर शिकवण या Girlfriend या चार दिवशीय कार्यक्रमात देण्यात आली तसेच कार्यकर्तेनी आप आपल्या भागातील समस्येवर लक्ष केंद्रींत करणेसाठी क्रांतीकारी गीतातुन ही संदेश दिले.या कार्यक्रमाचे आयोजन कोरो इंडिया संस्थेच्या वतीने करण्यात आले होते,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरो इंडिया या संस्थेच्या मंडळानी मोलाचे परिश्रम घेऊन आपेक्षित आसा कार्यक्रम घडवुन आणले,याबाबद महाराष्ट्रातील उपस्थीत संस्था संघटना कार्यकर्तेनी कोरो संस्था प्रमुख व त्यांचे सर्व कार्यकर्ते, म़डळाचे आभार व्यक्त केले आहे, आशी माहीती श्रमीक क्रांती आभियान,महाराष्ट्र,या संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले यांनी दिले आहे,