☸☸☸☸☸☸☸☸☸☸☸
🙏🏻🙏🏻🙏🏻 सविनय जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
रोजच धम्म प्रसार
आदेश
चरथ भिक्खवे चारिकं, बहूजन हिताय बहुजन सुखाय।
लोकानुकंपाय, अत्थांय, हिताय सूखाय देवमनुस्सानं।
देसेथ भिक्खवे, धम्मं आदि कल्याणं मज्झे कल्याणं।
परियोसान कल्याणं। सात्थं, सव्यज्जनं, केवल परिपुण्णं परिसुद्ध, ब्रह्मचरियं पकासेथ।
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
आज दि. 25 सप्टेंबर 2024, बुद्धाब्द 2568, बुधवार, भद्दपद मासो (पाट्टपादो मासो), बुधवारो, भाद्रपद माहे.
25 सप्टेंबर 1925 रोजी विश्वरत्न, बोधिसत्व, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये सत्कार
25 सप्टेंबर 1930, विश्वरत्न, बोधिसत्व प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पनवेल जवळ चिरनेर खेड्यात दंगल सत्याग्रह.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🪷 सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध 🪷
“वयाच्या 29 व्या वर्षी घरदार सोडून सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे”
“जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तेव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या.” “एक म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ असाटोकाचा भोगवाद आणि दुसरा प्रकार म्हणजे शरीराला आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या सांगणारा वैराग्य मार्ग”
“गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना त्यागून मध्यम मार्ग शोधला. ज्याला ‘सम्यक संबोधी’ असे म्हटले गेले. सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे मूळ कारण सापडले, त्याच्या निवारणाचा मार्ग सापडला, ज्याला चार ‘आर्यसत्य’ असे म्हटले आहे.
“पहिले सत्य म्हणजे जगात दु:ख आहे. “दुसरे सत्य त्या दु:खाला काहीतरी कारण आहे. “तिसरे सत्य त्या कारणाचे निवारणकरता येते. आणि चौथे सत्य त्या दु:खाचे निवारण करण्याचा मार्ग आहे”
“त्या मार्गाला गौतम बुद्धांनी ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ असे म्हटले आहे. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ अंग असलेला मार्ग ज्याच्याप्रमाणेआचरण केले तर दु:ख समूळ नष्ट होते. दु:ख आणि दु:खाचे निवारण यालाच गौतम बुद्धांनी प्राधान्यक्रम दिला. गौतम बुद्धांनी निर्थक गोष्टीवर कधीच भाष्य केले नाही”
“बुद्धांनी दु:खाची व्याख्या केली आणि या दु:खापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग दिला. या मार्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे ” “पहिला भाग आहे ‘शील, “दुसरा ‘समाधी’ आणि “तिसरा ‘प्रज्ञा’. शील म्हणजे नियम.
“समाजात कसे वागावे याचे नियम. समाजामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी जिचा मूलाधार न्याय, समता, व्यक्तिस्वातंत्र्य,समान संधी हा असेल. शील पालनाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे कारण मनावर ताबा असला तरच शील पाळता येते. एखाद्या व्यसनाधीन माणसाला व्यसनाचे दुष्परिणाम चांगले ठाऊक असतात. व्यसनातून बाहेर पडावे असे त्याला वाटत असते; पण मनावर ताबा नसल्यामुळे तो परत-परत त्या चक्रात अडकत जातो. मनावर संयम मिळविण्याकरितागौतम बुद्धांनी समाधीचा पुरस्कार केला. अशी समाधी शिकवली जिचा मूलाधार निसर्गनियम आहे. श्वास आणि संवेदनेवर आधारित साधना शिकवली, जी साधना कोणताही माणूस सहज करू शकतो, त्याला कसलाही अडथळा येत नाही. श्वास आणिशरीरावर होणार्या संवेदनांचे निरीक्षण करायला कसली आलीय अडचण. त्यातून मन एकाग्र होते आणि मनावर ताबा येतो”
“शील आणि समाधीच्या अभ्यासातून प्रज्ञा विकसित होते. प्रज्ञा म्हणजे ज्ञान. असे ज्ञान ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो आणि दु:खाचे कारण दूर केले की दु:ख दूरहोते. माझ्या दु:खाला मीच जबाबदारआहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दूर करावे लागेल याचा बोधत्याला होतो आणि तो कार्यप्रवण होतो. ज्या माणसाला हे तत्त्व समजले, ज्याने याचा अनुभव घेतला तो निर्थक गोष्टीत रमत नाही. मी या मानव समाजाचा एक घटक आहे आणि हा समाज सुखी असला तरच मी सुखी राहीन ही भावना त्याच्यात वाढीस लागते. मग आपोआपच जातीची बंधने तुटू लागतात. वैरभाव दूर होऊ लागतो”
“गौतम बुद्धांनी म्हटले आहे- ‘न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं।अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो”
“म्हणजे वैर वैराने शमत नाही ते अवैरानेच संपते. या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल प्रेम, मैत्री आणि सद्भाव वाढू लागतो. यातूनच करुणेचा उदय होतो. ही मैत्री करुणाच सामाजिक स्वास्थ्य वाढविते. मैत्री आणि करुणा हा बुद्धविचाराचा स्थायीभाव आहे. ते मानवी मनाचे टॉनिक आहे. विशेष म्हणजे ते सर्वत्र लागू होणारे आहे. त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही. त्यात काळानुरूप बदल करण्याची गरज नाही. पंचशील 2500 वर्षांपूर्वी आवश्यक होते. आजही ते तितकेच आवश्यक आहे, उद्याही ते तितकेच महत्त्वाचे राहणार आहे”
“बुद्धविचार काळाच्या कसोटीवर खरा ठरला आहे, म्हणून आजही तो तितकाच ताजातवाना आहे”
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
प्रत्येक रविवारी बुद्धविहारात गेलेच पाहिजे -डॉ.बाबासाहेब आंबेडकर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा।
सचितपरियोदपनं में एतं बुद्धान सासनं।
धन्यवाद, सविनय जयभिम
सर्वांचे मंगल हो, Be Happy
अश्वसेन बौद्ध
सूर्यकांत ढवळे 9702938552/8097037747
sundevdhawale@gmail.com
☸☸☸☸☸☸☸☸☸☸☸

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp