सामाजिक न्याय म्हणून संविधानाने मागास जातींना पुढारलेल्या जाती बरोबर आणण्यासाठी शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण देण्याची तरतूद केली,आरक्षण म्हणजे दुर्डीतील भाकरी.त्या वाटून घेणे, वाटून खाणे ,हा नियम होय.परंतु त्यातील अडचण ही की,लोकसंख्या वाढली पण दुर्डितील भाकरी वाढल्या नाहीत.नव्हे वाढविल्या जात नाहीत.कारण त्यालाही संविधानाने च मर्यादा घालून दिली आहे ती अशी की,50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये.असे असले तरी त्याचं संविधानाने हेही सांगितले आहे की,संसदेतील बहुमतांनी त्यात बदल करता येतो.परंतु तो बदल करायला राजकीय पक्ष तयार नाहीत. कारण यात त्यांचे नुकसान आहे,ते असे की,राजकारण्यांना मते मिळवण्यासाठी जात धर्म हा विषय जसा उपयोगी पडतो,तसाच हा आरक्षणाचा विषय पण उपयोगी ठरतो.जातींची धर्माची भांडणे.लावून त्या होलीवर आपली मतांची पोळी भाजून घेतात,याच प्रमाणे आरक्षणाचे भांडण प्रवर्गात लाऊन मते मिळवता येतात.धर्म जात प्रवर्ग हे त्यांचे हातचे राखून ठेवलेले पत्ते आहेत,जसे पत्त्याचा डावात खेळाडू राजा राणी एक्का ही तीन पत्ते राखून ठेवतात आणि त्यांचा केंव्हा कसा कधी उपयोग करायचा ? हे त्यांना चांगले जमते.कारण ते आरक्षणाच्या या खेळात तरबेज असतात.
जातीचा पत्ता वापरून झाला,लोक हुशार झाले,जागृत झाले,तो पत्ता आता कामी येत नाही,म्हणून दोन वर्ष धर्माचा पत्ता वापरून फायदा लाटला,पण तो आता कुचकामी ठरत आहे,कारण लोक त्यामागचे राजकारण समजून चुकले,देवांनी पण साथ सोडली,म्हणून आता तिसरा हातचा राखीव पत्ता तो म्हणजे आरक्षणाचा,तो वापरणे सुरू झाले आहे,या बाबतीत मतदार अजून जागृत झाला नाही,तो जागृत होईपर्यंत याचा वापर करणे चालूच राहील,अर्थात आरक्षण हे जातीला नसते,ते प्रवर्गाला असते,म्हणून आता प्रवर्गांमध्ये भांडणे लावणे सुरू केले, ओबि सी विरुद्ध मराठा,एस टी विरुद्ध धनगर ,आता तर प्रवर्गातील अंतर्गत झगडे पण लावणे सुरू झाले,उदा.बौद्ध विरुद्ध मातंग इत्यादी.
आपल्या देशातील जाती धर्म व्यवस्था आणि त्यांचे मागासलेपण यामुळे सामाजिक न्याय चे तत्व म्हणून हे सारे सुरू झाले ,पण याचा गैरफायदा राजकारणी घेत आहेत,याचे अनेक दुष्परिणाम होताहेत,या आरक्षण मुळे जाती निर्मूलन होणे ऐवजी जाती अजून घट्ट होताहेत.धर्मात सहिष्णुता निर्माण होणे ऐवजी द्वेष च वाढत आहे,मनुष्य संहार,जाळपोळ,भांडणे ,मारामाऱ्या ,हिंसाचार वाढतच आहे,यावर उपाय म्हणून मां.कांशीराम जी नी एक चांगला उपाय काढला,तो म्हणजे जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी.परंतु हे सूत्र वापरायला कोणत्याही पक्षाचे सरकार तयार नाही.म्हणूनच तर हा आरक्षणाचा घोळ सुटत नाही.हा गुंता काढायची इच्छा हवी,ती नाही. म्हणून यावर एकच उपाय आहे,तो हा की,सत्तेवर असलेल्या पक्षांना खाली खेचणे,कारण कितीही संघटन बांधले,प्रत्येक प्रवर्ग किंवा जात यांनी कितीही मजबूत संघटन उभे केले,मोर्चे उपोषण आंदोलने केली,तरी राजकारणी या उपायांनी घाबरणार नाहीत.कारण त्यांना माहित आहे की,निवडणुकीच्या या खेळात कोणता पत्ता हातचा ठेवावा आणि कोणता केंव्हा कसा वापरावा ? यात ते तरबेज आहेत.त्यामुळे मतदारास कसे मूर्ख बनवावे हे त्यांना पक्के जमते,आता तर सोपे झाले आहे,पैसे देऊन ,पद देऊन,आमदार,मंत्री करून संघटनांच्या प्रमुखास ते विकत घेतात.त्यामुळे संघटना प्रमुखावर विश्वास ठेऊन आरक्षण मिळत नाही.तर संघटनेचा उपयोग सत्ता पालटण्यासाठी केला पाहिजे,आपल्या जातीचा धर्माचा प्रवर्ग च मुखिया किंवा प्रतिनिधी सरकार मध्ये धाडून काहीच पदरात पडणार नाही.कारण तो तिथे गुलाम म्हणून असतो,मालक नव्हे.त्यास निर्णय घेण्याचा अधिकार नसतो,मुख्यमंत्री,पंतप्रधान,किंवा मंत्रिमंडळ बहुमत निर्णय घेत असतात.त्यामुळे संघटनांचे प्रतिनिधी जरी मंत्री झाले ,तरी काहीच उपयोग होत नाही,आरक्षण मिळत नाही.हा कितीतरी वर्षा पासुंचा अनुभव आहे,तरी अनुभवातून आता शहाणे झाले पाहिजे,आरक्षण मिळायचे झाले तर एकमेका विरोधी भांडून किंवा विरोधी मते देऊन जमणार नाही.हा उपाय नव्हे.तर प्रत्येक जातीला,धर्माला, प्रवर्गला आरक्षण हवे असेल तर,प्रत्येक वेळी सत्तेवर असलेले सरकार पडायचे च.मग ते कोणत्याही पक्षाचे असो,जो पर्यंत , जीसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी,हा कायदा,नियम,तत्व होणार नाही,तो पर्यंत असलेले सरकार पाडतच राहावे लागेल,तरच हा आरक्षणाचा प्रस्न सुटेल अन्यथा नाही.म्हणून असलेल्या सरकारला पाठिंबा न देता,त्याशी युती न करता,त्याचे विरोधी मतदान केले पाहिजे,जरी आपल्या जातीचा प्रवर्गाच,धर्माचा उमेदवार असला,आणि तो सत्ताधारी पक्षा कडून उभा असला तरी त्यास पाडले पाहिजे,एव्हडी हिम्मत,आत्मविश्वास,धैर्य,दृढ निश्चय मतदार करील तेंव्हाच त्यास आरक्षण मिळेल,त्याचे आरक्षण सुरक्षित राहील,
या बरोबरच खाजगीकरण ले कडाडून विरोध केला पाहिजे.कारण खाजगीकरण प्रत्येक गोष्टींचे झाले तर मग आरक्षण नष्ट च होणार आहे,यासाठी सत्तेतील पक्षाचे धोरण संपूर्ण खाजगीकरण चे असेल तर त्या त्या पक्षांच्या उमेदवारास पण मतदान करता कामा नये.असे करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड घालने होय.
तात्पर्य मतदाराने जागृत होऊन मतदान करावे,पाच वर्ष दुःखात अडचणीत काढायचे,संघटित व्हायचे,संघर्ष करायचा आणि ऐन मोक्याच्या वेळी चुकीचे मतदान करायचे,आणि परत येरे माझ्या मागल्या, ताक कन्या चांगल्या,असे होऊ नये.रात्र वैऱ्याची आहे, काळ सोकला आहे,सावधान.मतदान जपून करा.भ्रमात राहू नका.
लेखक: दत्ता तुमवाड,सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 26 ऑक्टोबर 2024.फोन: 9420912209.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp