

सामाजिक कार्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा–पोलीस निरीक्षक मानिक डोके
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी सामाजिक कार्य करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत पोलीस निरीक्षक डोके साहेबांनी रासेयो शिबिराच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले. देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन आंबेगाव ता. देवणी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून गावच्या सरपंच सौ. मुक्ताबाई सूर्यवंशी, सचिन पाटील हे मंचावर होते.यावेळी पोलिस निरीक्षक श्री. डोके साहेबांनी सायबर गुन्हेगारी व त्यापासून बचाव याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर बदलत्या सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला. आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांनी रुची घ्यावी असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाल सोमानी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रम अधिकारी प्रा. धनराज बिराजदार यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. शुभम जाधव श्री शंकर म्हेत्रे व रासेयो स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविकेचा सत्कार शिबिरात करण्यात आला.