माणूस आणि आदर्श माणूस कसा असतो जर मी जवळून पाहिलं असेल तर ते म्हणजे आदरणीय मारुती बुद्रुक पाटील सर होय. माणसं जन्माला येतात आणि जातात. प्रत्येकाला एक नेमून दिलेलं आयुष्य असतं. त्या आयुष्याच सोनं करायचं कसं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. ह्या आयुष्याचं सोनं करणं म्हणजेच…. रात्रंदिवस स्वतःबरोबर… इतरांसाठी समाजासाठी, दीनदुबळ्यांसाठी, गोरगरिबांसाठी साठी आणि लहान थोरांमोठ्यांसाठी जगणे होय. त्यांच्यासाठी कण कण झिजणे होय. सर्व आयुष्य समाजसत्कारणी लावणे होय. म्हणजेच आदर्श होणे होय.
आपल्या कार्यकर्तृत्वाने सामान्य माणसाच्या आयुष्याला आदर्शत्वाचे लेने प्राप्त होतं कारण त्याचं जगणं, त्याचं रोज रोज इतरांसाठी मरणं, इतरांच्या भल्यासाठी जगणं, इतरांच्या सुखासाठी रोज-रोज तळमळणं, जे जे माझ्याकडं आहे ते ते इतरांना देण्यातच आनंद आहे अशी कनवाळू ह्रदयं ज्यांच्याकडे असतात ती माणसं साधी माणसं नसतात, ती माणसं माझ्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने आदर्श माणसं गणली जातात.
अशा आदर्श व्यक्तिमत्त्वामध्ये ज्यांचं नाव अभिमानानं घ्यावं असं वाटतं ते म्हणजे माझे गुरुवर्य माननीय श्री प्रा. मारुती बुद्रुक पाटील सर…… होय. वीस वर्षापासून सरांना पाहतोय…. अगदी जवळून पाहतोय,…. अनेक घटना प्रसंगाच्या माध्यमातून अनुभवतोय…., क्षणाक्षणाला सरांना वाचण्याचा प्रयत्न करतोय ….,समजण्याचा प्रयत्न करतोय…., ओळखण्याचा प्रयत्न करतोय…., जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की, ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर, स्वकष्टांच्या प्रयत्नावर….. आपल्या ज्ञानाच्या, आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या, कला कौशल्याच्या जोरांवर व्यक्तीमत्वाला एक अष्टपैलू आदर्श असा आयाम दिला….. आणि व्यक्तिमत्त्वाला कौशल्याची सोनेरी किनार बहाल केली. असं अलौकिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे माझे प्रिय मार्गदर्शक गुरु माननीय श्री प्रा. मारुती बुद्रुक पाटील सर होय.
माझ्यासारख्यांच्या अनेकांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून ज्यांनी दीपस्तंभा ची भूमिका साकारली. मला व माझ्या सारख्या अनेकांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलेमध्ये आवर्जून भाग घ्यायला लावून आमच्या व्यक्तिमत्वाला अनेकविध कौशल्याचे पैलू पाडले. माननीय बुद्रुक पाटील सर आणि आदरणीय प्राध्यापक वैजनाथ सुरनर सर या दोन महान गुरुनी…. आमच्यासारख्या अनेक मुलांना पोटच्या पोराप्रमाणे समजून तळमळीने शिकवले, ज्ञान दिले, अनेक कौशल्य विकसित केले, म्हणून आज ते माझ्यासारख्यांच्या अनेकांच्या आयुष्याचे वळण बिंदू ठरले आहेत… आम्हाला ते कायम प्रेरणास्थानी आहेत.
माननीय बुद्रुक पाटील सरांनी श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय झरी बु मध्ये आल्यापासून ते आज तागायत काहीना काही नवीन आत्मसात करण्याचं, नव घडवण्याचं, विद्यार्थ्यांना व समाजाला काहीतरी नवीन देण्याचं , जे जे आदर्श आहे, जे जे चांगले आहे, जेजे कल्याणकारी आहे,जे जे समाजाच्या हिताचं आहे, विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारं आहे, ते ते अत्यंत तळमळीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला… त्याच्या त्याच्या योग्यतेला पारखून, ओळखून तळमळीने,जिद्दिने,आणि मेहनतीने घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे……
आदरणीय बुद्रुक पाटील सर एक शिक्षक म्हणून आदर्श तर आहेतच, पण … अष्टपैलू आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे अभिमानानं पहावसं वाटतं. माननीय सर आपण छंद जोपासलात… विकसित केलात आणि आमच्यात रुजवलात. सन्माननीय मारुती बुद्रुक पाटील सर आपण अनेक कौशल्याने परिपूर्ण आहात. अध्ययन आणि अध्यापन याबरोबरच सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक, अतिशय प्रभावी निवेदक, सुहृदय लेखक-कवी, प्रभावशील वक्ता, सामाजिक जाणीवेचा पटकथाकार, संदेश देणारा, विद्यार्थीप्रिय शिक्षक, सळसळत्या तारुण्याला प्रेरणा देणारा नायक, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा अभिनेता, पंचक्रोशीतल्या अनेक प्रश्नांना शब्दबद्ध करणारा ज्येष्ठ पत्रकार, आपल्या कष्टाने परिस्थिती बदलून यशस्वी होणारा आदर्श पुत्र, आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना सत्यात साकारणारा श्रीकृष्ण, अध्यात्मिकता आणि सामाजिकता यांच्या काठाकाठाने प्रवाहित होणारा सरीता सागर. बुलंद आणि पहाडी आवाजांचा दिलदार बादशहा, स्वरचित गीताना चाल देऊन गीत गायन करणारा लोक गायक, आध्यात्मिकतेचा संदेश देणारा शिक्षकी संत, रक्तदानातून दातृत्व सिद्ध करून रुग्णसेवा करणारा आदर्श तरूण, व्यसनमूक्तीचा समाजात लेखणी आणि विचारांने जागर घडवणारा समाजचिंतक, सूर्याच्या पहिल्या किरणांचा चाहता सूर्यवंशी पुत्र, सामाजिक कनव असलेला लोकशिक्षक, माणुसकीवान माणसाचं संघटन आणि संपादन करणारा निर्मळ माणूस, या बरोबरच सौभाग्यवती पत्नीच्या मनातला आदर्श पती, मुलांच्या मनातील अष्टपैलू आयाम देणारा आदर्श पिता, आणि रोज नव काहीतरी संपादन करणारा छंदी आनंदी चहाता…..
प्रज्ञावान, ज्ञानवान, शीलवान, चारित्र्यवान, माणुसकीवान ,दातृत्ववान, कष्टवान, कलावान ,बुद्धिवान, गुणवान, कीर्तिवान अशा अनेक गुणांनी निपून असलेला आदर्श व्यक्ती म्हणजे माझे गुरूवर्य प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील सर होय…
आज त्यांचा जन्मदिवस मोठ्या सामाजिक भावनेने व साधेपणाने संपन्न होत आहे. त्यांना आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक…..
म्हणून माझ्या कवितेच्या ओळीत असे म्हणावे वाटते की….
“प्रज्ञा प्रपिता तो आमुचा
ज्ञानी “ज्ञाता” तो विशापती
न्याय राज्य ते विद्येचे
सर्वांचा होतो सखा सोबती…… “
आनंदी, सुखी,आरोग्यदायी आणि समाधानी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा……
नवीन वर्षाच्या प्रिय सरांना व सर्वांना खूप खूप शुभेच्छा.🌹🌹👏👏
शुभेच्छुक:-श्री दत्तात्रय जाधव पाटील,नऊकुंड झरीकर(जिल्हा न्यायालय,पुणे)
संपर्क क्रमांक:-९६८९२५०२५१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp