
‘शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात’
सार्वजनिक जयंती उत्सव समिती संपुर्ण लातूर जिल्हा कडून उदगीर येथे दि.13.02.2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा व प्रतिमेचे पुजन, मानवंदना व भगवा ध्वज फडकावून शिवश्री राम बोरगावकर तहसीलदार उदगीर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्गुरू शिवश्री.अॅड.डॉ.योगाचार्य स्वामी महाराज उपस्थित होते. या शिवजयंती उत्सवा निमित्य संपूर्ण लातूर जिल्हयामध्ये विविध कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष-शिवश्री.डॉ.रामचंद्र भांगे व तालुका अध्यक्ष व स्वागताध्यक्ष देविदास चिखले यांनी अपार मेहनत घेवून उद्घाटन सोहळा यशस्वी केले.
या सार्वजनिक शिवजयंती कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्हाभर शिवरायांचे विचारांचे व त्यांचे लोकप्रशासनाचे, न्यायप्रिय कारभाराचे प्रेरणा व प्रबोधन यात्रा , स्वामीजींच्या दिव्य नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाचे डॉ.रामचंद्र भांगे व इतर सक्रिय शिवप्रेमी, शिवसप्ताह जिल्हाभर राबविणार आहेत. या सार्वजनिक शिवजयंती उत्सवा निमित्त संपुर्ण जिल्हयामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये व प्रत्येक गावात शिवरायांचे न्यायप्रिय अनुशासनाची प्रेरणा नव्या लोकशाही सरकारमध्ये प्रतिबिंबीत होणे काळाची गरज असल्याचे शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे म्हणून शिवरायांचे प्रेरणा ही शिवजयंती निमित्त संपुर्ण लातूर जिल्हाभर व संबंध महाराष्ट्रभरा मध्ये उमटावी व सर्वत्र शिवशाही नांदावी आणि हिच खरी शिवजयंती निमित्त शिवरायांना मानाचा मुजरा करून प्रेरणा व समाजप्रबोधन यात्रा उद्घाटन करण्यात आले.
या सार्वजनिक शिवजयंती साप्ताहीक उद्घाटन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी न्यायाधीश अॅड.बी.एच.शेख साहेब, लातूर व कॅ.डॉ.चंद्रसेन मोहिते, प्रा.गोविंदराव जांमखंडे, देविदासराव औटे, प्रा.डॉ.विजयकुमार पाटील, रामदास माळेगावे पाटील, अ.भा.मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष नांदेड, लहू राजूळे, बालाजी बिरादार येणकीकर, बालाजी कारभारी, विजयकुमार जाधव, बाबुराव दंडे, विजयकुमार पाटील, अशोक पाटील, माधव भांगे, रऊफ शेख वाढवणा, विकास मुसणे, धोंडीबा मरेवार, अमोल सुनिल पाटील, जॅकी दादा सावंत, बालाजी भोसले व इतर शिवभक्त व शिवप्रेमी उपस्थित होते.


