सावरगाव येथे मनरेगा योजनेतून तालुक्यात सर्वप्रथम बांबू लागवड,
देवणी/ प्रतिनिधी : तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्त्व समजावून सांगून त्यांना प्रेरित करून बांबू लागवड करण्यासाठी तयार केले.सर्वात जास्त लाभार्थी या योजनेत सहभागी होऊन बांबू लागवड स्वयंप्रेने करायला लागले बांबू लागवड हे शेतकऱ्यांना शेती पूरक उत्पन्न असून, नरेगा योजनेतून बांबूंचे रोपे वाहतुकीसह उपलब्ध करून दिले जाते व तीन वर्षभरात त्याचे संगोपन करण्याचे सुद्धा रोजगार या योजनेतून दिली जाते.त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.श्री.सोपान अकेले गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणी यांनी केले. त्यांच्या प्रेरणेने आज सावरगाव येथील श्री. संजय बिरादार यांच्या शेतामध्ये बांबू लागवड कार्यक्रम संपन्न झाला यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.याप्रसंगी गावातील आजी माजी सरपंच,शेतकरी लाभार्थी, तांत्रिक कर्मचारी,त्या गावचे ग्रामसेवक श्री मूर्के आय. एस. तसेच ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक व इतर नागरिक उपस्थित होते.
