साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती हंचनाळ येथे संपन्न
@ साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रत्येकाच्या घरा घरात पोहचला पाहिजे — प्रा, मारोती कसाब
@ हलक्याच्या गजरात भव्य दिव्य मिरवणुक संपन्न
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील हंचनाळ येथे लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी आण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ जानकाताई सुर्यवंशी,प्रा मारोती कसाब, डॉ,व्यंकट सुर्यवंशी, तांबोळी एफ बी मुख्याध्यापक, वैजयंता पाटील पोलीस पाटील, शाहिर अंकुश सिंदगीकर , डि, एन कांबळे,सदाविजय पवार,सुनील पाटील, गजानन गायकवाड उपसरपंच,मा पत्रकार लक्ष्मण रणदिवे,पद्ममाकर कांबळे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,तसेच ध्वजारोहण वैजयंता पाटील,पोलिस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ जानकाताई सुर्यवंशी, यावेळी जयंती समिती अध्यक्ष धोडिराम गायकवाड,उपाध्यक्ष सुधाकर सुर्यवंशी,कार्याध्यक्ष अंबादास सोनकांबळे, सचिव सदाशिव सुर्यवंशी, सुनील सुर्यवंशी, सचिन सुर्यवंशी,ओमप्रकाश, रामदास सोनकांबळे,दिपक मिरगाजी,छाया मिरगाजी, प्रियंका सुर्यवंशी,अरूणाबाई सोनकांबळे, सोनाबाई सुर्यवंशी,देविदास सुर्यवंशी,रतन सुर्यवंशी,विलास सुर्यवंशी,जनार्धन सुर्यवंशी,प्रदिप सुर्यवंशी, दिगंबर सुर्यवंशी आदिची उपस्थिती होती, तसेच शाळेतील विद्यार्थीही मनोगत व्यक्त केले होते,प्रा मारोती कसाब यांनी आण्णासाठे यांच्या कार्यकाळ खडतर जीवन व साहित्य लोकापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे आजही फकिरा कांदबरी महाराष्ट्राला पहिला बहुमान साहित्याचा माध्यमातून मिळवले आहे अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पवाडे, लोकनाट्य हे कला जिवंत ठेवण्याचे काम फक्त आण्णाभाऊ साठे यांनीच करु शकले आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरा घरात अण्णाभाऊचा विचार पोहचला पाहिजे,असे सखोल मार्गदर्शन केले व सुत्रसंचलन पद्ममाकर कांबळे, तर आभार डि, एन कांबळे शाहिर यांनी मांडले, तर डि, जि,न लावता हलक्याच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक सर्व बहुजनांच्या सहकार्याने जंयती मोठ्या उत्साहाने पार पडली आहे,