सिद्धया स्वामी यांचे निधन
देवणी : सीमावर्ती भागातील तथा भालकी तालुक्यातील आळंदी येथील सेवानिवृत्त शिक्षक सीद्धय्या राचय्या स्वामी वय वर्ष ८८ यांचे बुधवार दि.२ ऑगस्ट रोजी गुलबर्गा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आळंदी (ता.भालकी जि. बिदर ) येथील त्यांच्या शेतात गुरुवार दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अंत्यविधी होणार आहे .
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सात मुली, नातू पणतू असा परिवार आहे.
