देवणी / प्रतिनिधी (रणदिवे लक्ष्मण) : तालुक्यात अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वाळू तस्करानी उच्छाद मांडला आहे चोर ते चोर आणि बादशहाहून थोर या उक्तीप्रमाणे महसूल विभागाच्या वरद हसताखाली वाळू तस्कराची अरेरावी वाढली असून वाळू चाळण्यासाठी चाळणी का दिली नाही म्हणून बोरोळ येथील एका मजुरांना सिधिकामठ येथील एका वाळू तस्करानी बोरोळ येथील मजुरांच्या गुप्तांगावर लाथ बुक्यांनी मारहाण केली त्याला जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्या गरीब मजुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे गौण खनिज च्या नावाखाली या संपत्तीचे रक्षण करणे किंवा त्यांचे अधिकृत लिलाव करणे महसूल विभागाकडून अपेक्षित आहे परंतु असे होताना दिसत नाही मांजरा काठावरील सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून महसूल कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे ऐवजी वाळू तस्कराशी संगनमत करून आपले हात काळे करून घेताना दिसत आहेत अशी अनधिकृत वाळू तस्करी करणार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी पिढीतकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp