
उदगीर / प्रतिनिधी : सी-डॅक कंप्यूटर्स, उदगीर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. दर वर्षा प्रमाणे या ही शैक्षणिक वर्षी २०२४-२५ मध्ये १०० पैकी १००, १०० पैकी ९९ व १०० पैकी ९८, गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम, द्वितीय व तृतीय असे उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात सन्मानित

करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. उषा कुलकर्णी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब सहकारी बँकेचे बँक मॅनेजर शिवाजी पाटील साहेब, मनसे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड सर आणि मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सी- डॅकचे संचालक सतीश उस्तुरे सर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि करिअरसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. उषा कुलकर्णी यांनी संगितले की आज सी-डॅक कॉम्प्युटर्स ही संस्था परिसरामध्ये व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठरली आहे. सी-डॅकला अग्रगण्य बनवण्यात उदगीर, जळकोट, देवणी परिसरातील जनतेने व विद्यार्थ्यांनी आमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर दाखवलेल्या प्रेमाचा, सहकार्याचा मोलाचा वाटा आहे. आम्ही उदगीरकरांच्या व परिसरातील जनतेच्या सेवेत २८ वर्षापूर्वी सी-डॅक कॉम्प्युटर्स ही संस्था सुरू करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर्सचे सर्वतोपरी ज्ञान देण्याचे प्रामाणिक कार्य करत आहोत. याचीच परिनीती म्हणजे सी-डॅक कॉम्प्युटर्सला मिळालेली वेगवेगळी पारितोषिके होय. या संस्थेमधून आजपर्यंत ३०७५० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून १६५२० विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रात नोकरीवर आहेत. इ.स.२००२ ते २०२४ पर्यंत MKCL तर्फे महाराष्ट्र स्तरावर ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राचे’ पारितोषिक मिळत आले आहे.
प्रमुख पाहुणे शिवाजी पाटील सर यांनी मानवाच्या प्रगतीसाठी संगणक तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, संगणकामुळे मानवी प्रगतीला नवे आयाम संगणक हे केवळ एक यंत्र नसून, ते मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवत आहे. शिक्षण, वैद्यकीय सेवा, संशोधन, औद्योगिक क्षेत्र आणि दैनंदिन जीवन यामध्ये संगणकाने आमूलाग्र बदल घडवले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बिग डेटा, (Cloud Computing) यांसारख्या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील संधी अधिक वाढणार आहेत
यावेळी संजय राठोड सर यांनी संगणकाच्या मदतीने आयुष्य अधिक सुंदर आणि सोपे कसे बनते यावर मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास वेळेची बचत होते, नवनवीन संधी निर्माण होतात आणि जीवन अधिक सोयीस्कर बनते. आजच्या युगात ऑनलाइन शिक्षण, डिजिटल बँकिंग, वैद्यकीय सुविधा आणि दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संगणकामुळे सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मक दिशेने करावा.
२०२४ मध्ये महाराष्ट्रात प्रथम 100 पैकी 100 गुण घेणारे विद्यार्थी कांबळे आदित्य, गुरमे अदिती, चाळकापूरे संस्कार, मुंडे सुमित, तोलसरवाड रोहिणी , नाईक शिवकन्या नाईक शिवानंद , नैनवाड सुमित, पाटील इंद्रायणी , पोलावार पार्थ, बिरादार आशिष, बोधनकर प्रथमेश, बोळेगावे वैष्णवी, मळगे वैभव, मुंडकर गणेश , मोरतळे आदर्श, शिंदे पुरूषोत्तम, साबणे शार्दुल, सोळुंके प्रथमेश, स्वामी आदित्य, केंद्रे प्रतीक्षा, चव्हाण लक्ष्मी, मोरे माऊली. महाराष्ट्रात द्वितीय 100 पैकी 99 गुण घेणारे विद्यार्थी एकुंडे पार्थ, कटारे मुक्ता, कांबळे प्रमोद, कारभारी आरती, कासळे बाबू, कासार सुमेशा, कोकणे शुभम, कवठेकर अभिजीत खांडे अशिष, गंडिगुडे भाग्यश्री, गुट्टे निर्जला, चल्लावार वरद, चिट्टे वैष्णवी, चौधरी पृथ्वीराज, टोकलवाड गणेश, पठाण शाहिदखान, पाटील नंदिनी, पाटोदे अमर, फुले सूरज, बिरादार आदित्य, मलकापूरे करण, मुस्कावाड किशोर, म्हेत्रे अश्विनी रंगदाळ व्यंकटेश, लोखंडे गणेश, वाघमोडे कृष्णा, वाघमारे श्रेया, शंबाळे शुभम, शिंदे संस्कृती, शेख मुदशीर, सूर्यवंशी नरसिंग स्वामी गौरव, स्वामी तनुजा, हाशमी सुबिया, होकर्णे मयूर. महाराष्ट्रात तृतीय 100 पैकी 98 गुण घेणारे विद्यार्थी कमलापूरे संकेत, कमलापूरे स्नेहा, स्वामी रेणुका, कसबे अनुसया, कसबे रवीकांत, कांबळे तनिषा, कांबळे निलेश .कांबळे भीम, कांबळे शुभम ,कांबळे संविधान, कटमपल्ले अनुराग, कारभारी प्रतीक, कुलकर्णी श्रीनिवास, केंद्रे मोहिनी, तांबोळी कैफ, कौडगावकर श्रेया, गुराळे श्रुती, गोतावळे सपना, गोतावळे स्नेहा, डावळे भक्ती, तोंडारे सपना, तोगरगे श्रुती, तानकाकोटे विक्रांत, दापकेकर आनंद, देमगुंडे तानाजी, धनुरे भाग्यश्री, धामणगावे चंद्रकांत, पडिले उत्कर्षा, पतंगे साक्षी, पवार यश, पवार विजयकुमार, भोळे अर्जुन, मुखेडे डावळ, मुरुडकर संजीवनी, मुल्ला सुलतान, मुसळे समृद्धी, मोरतळे समीक्षा, याचावाड राधा, याचवाड रोहिदास, वंजारे सुप्रिया, वंजारे श्रुती, वझरकर अभिराम, वाघमारे शांती,विळेकर कुनाल, शिळे अभिजीत, शेख सुफियान, शेख हनीफ, शेळगे श्रद्धा, शेख अलीना, सय्यदा सानिया, साखरे आदित्य, सूर्यवंशी निर्जला, सूर्यवंशी ऐश्वर्या, सूर्यवंशी दीपक, सूर्यवंशी रेणुका, सोनकांबळे प्रणव, सोनटक्के व्यंकटेश, होळगीर संजीवनी, मोटेवाड जीवन. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अशाच यशाचे प्रदर्शन भविष्यातही घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि उत्कृष्ट शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दयानंद टाके सर, विवेक देवर्षे सर, निकत चाउस मॅडम, प्रकाश गायकवाड सर, संगीता दुंडे मॅडम, राजनंदिनी कांबळे मॅडम, यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. यावेळी या शिक्षकांचा विशेष सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन मुबारक पटेल यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि मार्गदर्शकांना दिले.
